आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाड- ब्लॅकमेलिंगला कंटाळून मुलगी सलग 3 दिवस पोलिसांकडे गेली, निराश होऊन केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - छेडछाड आणि तरुणाकडून ब्लॅकमेलिंगने त्रस्त होऊन 10वीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाने तिचे फोटो फेसबुकवर अपलोड केले होते. विद्यार्थिनी त्याची तक्रार करण्यासाठी 3 दिवसांपासून द्वारकापुरी पोलिसांत चकरा मारत होती. परंतु अधिकारी फक्त ‘बघूत-करूत’ असे म्हणून टाळाटाळ करत राहिले. गुरुवारी त्या तरुणाने किडनॅप करण्याची धमकी दिली, तेव्हा संध्याकाळी 4 वाजता ती वडिलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये गेली, परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही. शेवटी रात्री 9.30 वाजता विद्यार्थिनीनेच आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये विद्यार्थिनीने वडिलांची माफी मागत तिची इमेज खराब होत असल्याची बाब लिहिली. 

 

मुलाच्या आईने दिली होती अॅसिड हल्ल्याची धमकी...
- इंदूरच्या प्रजापत नगरातील जगदीश जाट यांची 16 वर्षीय मुलगी गायत्रीला तेथील रहिवासी मिलन चौहान त्रास देत होता. तो दररोज तिचा पाठलाग करून छेड काढायचा. मुलीकडून घरच्यांना माहिती मिळाल्यावर ते मिलनच्या घरी त्याची समजूत घालण्यासाठी गेले. तेथे तरुणाची आई माया यांनी त्यांनाच अॅसिड हल्ल्याची धमकी देत म्हटले की, कितीही पोलिस येऊ द्या, माझ्या मुलाला काहीच करणार नाहीत. पोलिसांना पैसा जातो.

 

गोंधळानंतर आरोपी आणि आईवडील ताब्यात
आरोपी तरुण आणि त्याच्या आई-वडिलांना पकडून त्यांच्यावर छेड़छाड़, पॉक्सोच्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तरुणाच्या घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस स्टेशन आणले. धारा में केस दर्ज किया है। आसपासचे लोक म्हणतात की, तरुणाची आई या भागात अवैध धंदे करते.

 

मृत्यूनंतर पोलिसांना आली जाग, एसआय झाला सस्पेंड
डीआयजी हरिनारायणाचारी मिश्र यांनी वेळीच कारवाई न करणाऱ्या एसआय ओंकार कुशवाह यांना निलंबित केले आहे. तरुणावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बेजबाबदारपणाबद्दल एएसपींना शुक्रवार सकाळपर्यंत अहवाल मागवण्यात आला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...