आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिन्सिपलनेच केले एवढे अत्याचार, शिक्षिकेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची होती धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर/खंडवा - अडीच वर्षांपासूनची ओळख असलेली परिचित शिक्षिकेसोबत दुष्कर्माच्या प्रकरणात पोलिसांनी सध्याचा प्राचार्य आणि माजी डीपीसीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राचार्याने बलात्कारादरम्यान आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ बनवले होते. याद्वारे तो शिक्षिकेला ब्लॅकमेल करत होता. ही अत्याचाराची घटना मोघट येथील रहिवासी एका शिक्षिकेसोबत झाली. त्यांनी काही दिवसांपूर्वीच सूरजकुंड कन्या विद्यालयाचा प्राचार्य संजय निंभोरकर (54) याच्याविरुद्ध एसपी नवनीत भसीन यांना तक्रार केली होती. 

 

असे आहे प्रकरण..
पीड़िता म्हणाली, बदनामीच्या भीतीने कुणाला सांगितले, आतल्या आत कुढत राहिले...
- मी आणि माझे पती दोघेही शिक्षक आहोत. यामुळे संजयशी त्यांची ओळख झाली. अनेक शासकीय कार्यक्रमांत त्याची भेट व्हायची. 28 ऑगस्ट 2015 रोजी जेव्हा त्या घरी एकट्या होत्या, तेव्हा संजय त्यांच्या घरी आला. ओळखीचा असल्याने त्या त्याच्यासाठी चहा बनवण्याकरिता किचनमध्ये गेल्या. यादरम्यान संजयने पाठीमागून येऊन बळजबरी धरून बेडरूममध्ये नेले. तिच्यावर अत्याचार केले. विरोध केल्यावर जिवे मारण्याची धमकी दिली. त्या म्हणाल्या, यादरम्यान संजयने त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटोही शूट केला. याआधारे तो सातत्याने त्यांना फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. बदनामीच्या भीतीमुळे अडीच वर्षे तिने कुणालाच काहीही सांगितले नाही. मनातल्या मनात कुढत राहिली. संजय सोशल मीडियाच्या माध्यमातून लगातार तिला त्रास देऊ लागला होता, यामुळे ती मानसिक तणावात होती. कुटुंबीयांनी तणावाचे कारण विचारल्यावर ही बाब समोर आली. याप्रकरणी तपासानंतर पोलिसांनी महिला व कुटुंबीयांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून जबाब नोंदवला व प्राचार्य संजय निंभोरकरविरुद्ध कलम 376, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला. (शिक्षिकेने जसे एफआयआरमध्ये नोंदवले...) 

 

याआधीही प्राचार्यावर लागले आहेत आरोप
- संजय निंभोरकरचे वादांशी जुने नाते आहे. नर्मदानगरच्या कन्या स्कूलच्या विद्यार्थिनीने असेच आरोप त्याच्यावर याआधी लावले होते. डीपीसी पदावर असताना डिझेल घोटाळ्यातही त्याची चौकशी झाली होती.

 

शिक्षिकेचे आरोप चुकीचे...
- मी जबाबदार पदावर आहे. असे कोणतेही कृत्य करू शकत नाही ज्यामुळे माझी प्रतिमा मलिन होईल. शिक्षिका माझ्यावर खोटे आरोप करत आहे. मी तिच्यासोबत कोणतेही वाईट कृत्य केले नाही. - संजय निंभोरकर, प्राचार्य, कन्या सूरजकुंड स्कूल 

 

- शिक्षिकेने प्राचार्यावर गंभीर आरोप केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. तपासात आरोप खरे सिद्ध झाल्याने प्राचार्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

-मंजू शर्मा, एसआय व तपास अधिकारी, मोघट पोलिस स्टेशन.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे इन्फोग्राफिक्स व इतर फोटोज...

बातम्या आणखी आहेत...