आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ - मध्य प्रदेशच्या राजधानीत बँक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीला किडनॅप करून गँगरेप करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या माजी प्रियकरासमवेत 4 आरोपींना अटक केली आहे. तरुणीने तक्रारीत सांगितले की, ती कोचिंगनंतर एक्स बॉयफ्रेंडला भेटायला एमपी नगर परिसरात उभी होती. यानंतर आरोपीने फसवून तिला मित्राच्या घरी नेले. येथे दोरखंडाने बांधून दोन जणांनी तिच्या गँगरेप केला. आणि कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तत्पूर्वी, शहरात 5 महिन्यांपूर्वीही रेल्वे स्टेशनजवळील सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर 5 जणांनी पाशवी अत्याचार केले होते.
मीडियासमोर काय म्हणाली होती पीडित तरुणी...
- गँगरेपच्या 4 दिवसांनी मीडियासमोर आलेल्या पीडितने आपल्यावर झालेल्या अन्यायाची पूर्ण माहिती दिली.
- तरुणी म्हणाली होती की, ती आणि तिच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसलेला होता. यादरम्यान पोलिसांचा व्यवहार सर्वात घाणेरडा होता.
- पीडितेने नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, रेल्वे पोलिसांतील टीआय अंकल खूप उद्धट होते. 3-4 पोलिस स्टेशन्समध्ये चकरा मारल्या, परंतु पोलिसांनी आमची कोणतीही मदत केली नाही. पूर्ण दिवसभर आम्ही भटकत राहिलो, परंतु कुणीही ऐकून घेतले नाही.
- रेल्वे एसपीच्या वक्तव्यावर तरुणी म्हणाली की, मी त्यांच्यासमोर विनवणी करत होते आणि त्या हसत होत्या, त्याही महिलाच आहेत.
- पुढ पीडिता म्हणाली, "चारही नराधमांना जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना भरचौकामध्ये फाशी दिली पाहिजे. जर ते सुटून बाहेर आले, तर पुन्हा रेप करतील.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, काय होते पूर्ण प्रकरण...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.