Home | National | Madhya Pradesh | विवाहितेवर शेतात पाशवी गँगरेप, सुनेला वाचवायला आलेल्या सासूलाही बेदम मारहाण Shocking Gangrap On 24 Year Old Married Woman In Dhamnod Dhar Mp

विवाहितेवर शेतात पाशवी गँगरेप, सुनेला वाचवायला आलेल्या सासूलाही बेदम मारहाण, 5 जणांविरुद्ध गुन्हा

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 11, 2018, 12:18 AM IST

धार जिल्ह्यातील धामनोदमध्ये एका विवाहितेवर गँगरेपचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेने सांगितले, शेतातून घरी परतताना 5 जणांनी

 • विवाहितेवर शेतात पाशवी गँगरेप, सुनेला वाचवायला आलेल्या सासूलाही बेदम मारहाण Shocking Gangrap On 24 Year Old Married Woman In Dhamnod Dhar Mp

  इंदूर - धार जिल्ह्यातील धामनोदमध्ये एका विवाहितेवर गँगरेपचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेने सांगितले, शेतातून घरी परतताना 5 जणांनी तिची वाट अडवली आणि निर्मनुष्य जागेवर नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केले. विवाहितेच्या तक्रारीआधारे पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महिलेने सांगितले, ही घटना मंगळवार, 8 मे रोजी घडली होती. कुटुंबीय घरी आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

  महिलाने FIRमध्ये लिहिले, शेतातून उचलून घेऊन गेले होते
  - पोलिसांच्या मते, तालाबपुराच्या रहिवासी 24 वर्षीय महिलेने गुरुवारी पोलिसांत जाऊन 5 जणांविरुद्ध गँगरेपची तक्रार दाखल केली. पीडिता म्हणाली की, 8 मे रोजी दुपारी ती शेतात काम करत होती. यादरम्यान गावातील तरुण तिच्या शेतावर आले. यापैकी तिघे शेतातील एका झाडाजवळ उभे होते, एक जण तिच्याजवळ आला. त्याने हात पकडल्यावर मी ओरडू लागले, त्यावर त्याने तोंड दाबून झाडकडे नेले. येथे चौघांनी मला घेरले. तेवढ्यातील गावातीलच आणखी एक तरुण तेथे आला. मग सर्वांनी आळीपाळीने गँगरेप केला. मी ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माझे तोंड दाबून ठेवले. कशीबशी तिथून सुटून मी मदतीसाठी आरडाओरड केली, तेव्हा माझ्या सासूने माझा आवाज ऐकला.

  माझा आवाज ऐकून सासू आली तर तिलाही मारले
  - महिलेने पोलिसांना सांगितले की, गँगरेपदरम्यान जेव्हा मी ओरडले तेव्हा माझा आवाज ऐकून सासू तेथे धावत आली. सासूने आरोपींना विरोध केला तेव्हा सर्वांनी मिळून माझी सासू आणि मला दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर त्यांनी कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिथून पळून गेले.

  भीतीमुळे आले नव्हते पोलिसांत
  - पीडिता म्हणाली की, 8 मे रोजी घटनेच्या दिवशी ती घरी पोहोचली तेव्हा तिने चुलत सासऱ्याला पूर्ण हकिगत सांगितली. चुलत सासऱ्याच्या म्हणण्यावरून मी माझ्या माहेरात पूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर मी एवढी भ्यायले होते की, पोलिसांत जाण्याची हिंमतच उरली नव्हती. गुरुवारी माहेरातून माझे नातेवाइक आले आणि कुटुंबीयांना त्यांनी धीर दिला तेव्हा कुठे पोलिसांत तक्रार द्यायला आले. पीडितेसोबतच तिच्या सासूने त्यांना मारहाण झाल्याची माहिती पोलिसांत दिली.

  5 जणांवर गुन्हा दाखल
  - पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप जगदीश, संजय जगदीश, दिनेश भागीरथ, संतोष भागीरथ, रामदास मिश्रीलाल यांच्याविरुद्ध गँगरेपचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस म्हणाले, महिलेच्या तक्रारीची शहानिशा केली जात आहे. या प्रकरणाच्या अधिक तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे इन्फोग्राफिक्स...   

Trending