आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुफ्तगू जावेद साहेबांसोबत...म्हणाले, मोगलांचा झेंडा नव्हता हिरवा, देशाचे 90% लोक सहिष्णू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ -  चित्रपट गीतकार जावेद अख्तर यांचा आज 73वा वाढदिवस आहे. जावेद साहेब हे प्रभावी गीतकार आणि शायर आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. त्यासोबतच ते परखडपणे देश, धर्म आणि लोकशाहीबाबतही बोलत असतात. जावेद अख्तर हे राज्यसभा सदस्यही राहिले आहेत. दैनिक भास्कर समुहाच्या ‘गुफ्तगू जावेद अख्तर के साथ’या कार्यक्रमात त्यांनी परखडपणे आपली मते मांडली होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जावेद साहेबांसोबतची गुफ्तगू DivyaMarathi.Com  खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे.

 

जावेद अख्तर म्हणाले होते, ज्या प्रकारचा मुस्लीम धर्म भारतात आहे, तसा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. जो धर्म भारतात आला, तो या देशात मिसळत गेला, असे मत त्यांनी मांडले होते. मोगलांचा झेंडा हिरवा नव्हता तर त्यांच्या झेंड्यावर पिवळ्या रंगाचा वाघ असायचा, असेही त्यांनी सांगितले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, 1857 च्या बंडाबद्दल काय म्हणाले होते जावेद अख्तर... 

बातम्या आणखी आहेत...