आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यप्रदेश काँग्रेसची धुरा कमलनाथ यांच्या खांद्यावर, ज्योतिरादित्य सिंधिया प्रचार प्रमुख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छिंदवाडाचे खासदार कमलनाथ यांना काँग्रेसने मध्यप्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. - Divya Marathi
छिंदवाडाचे खासदार कमलनाथ यांना काँग्रेसने मध्यप्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.

भोपाळ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छिंदवाडा येथील खासदार कमलनाथ यांना मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले आहे. दुसरीकडे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महासचिव अशोक गहलोत यांनी ही नियुक्ती जाहिर केली आहे. 

 

4 कार्यकारी अध्यक्ष
- बाला बच्चन, सुरेंद्र चौधरी, जीतू पटवारी आणि रामनिवास रावत यांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. 
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह आणि विरोधीपक्ष नेते अजयसिंह यांना सध्या कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. 
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अरुण यादव यांच्या कामाचे कौतूक केले. त्यांनी आपली जबाबदारी योग्य सांभाळल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

 

या  वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक 
- मध्यप्रदेशात या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेस सत्तेत येण्याचा प्रयत्न करणार आहे. 
- दुसरीकडे, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे की पक्षाने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित केलेला नाही. सध्या कमलनाथ आणि सिंधिया दोघेही शर्यतीत आहेत. 
- मध्यप्रदेशमध्ये 2003 पासून भाजप सत्तेत आहे. 

बातम्या आणखी आहेत...