आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेश : नियंत्रण सुटलेल्या ट्रकची 2 रिक्षांना धडक; 10 ठार, 4 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्य प्रदेशच्या कटनी-उमरिया नॅशनल हायवे 78 वर शनिवारी रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी 4 जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलिसांच्या मते उमरियाकडे जाणाऱ्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने दोन रिक्षांना धडक दिली. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर घटनास्थळाहून फरार झाला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये आणि जखमींसाठी 50 हजारांच्या नुकसान भरपाईची घोषणा केली. 


असा झाला अपघात 
अपघात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता घडला. नॅशनल हायवे 78 वर कटनीहून एक ट्रक उमरियाकडे चालला होता. त्यावेळी 2 रिक्षा उमरियाहून कटनीला येत होत्या. मझगंवा गावाजवळ ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकरे रिक्षाला धडक दिली. 


एक रिक्षा चिरडली 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ट्रक वेगामध्ये होता. धडकेनंतर एक रिक्षा अनेक फूट लांब जाऊन पडली. तर दुसऱ्या रिक्षाला ट्रकने चिरडले. त्यातील 9 जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे 5 जण दोन रिक्षांमध्ये अडकले होते. आसपासच्या गावातील लोकांनी त्यांना मदत केली. 


ट्रक ड्रायव्हर फरार, लोकांनी लावला जाम 
अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला. घटनेबाबत लोकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी हायवेवर आंदोलन केले. नंतर पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. 


मासे विकण्यासाठी जात होते 
अपघातात ठार झालेले काही जण बनहरा तलावास मासेमारीसाठी गेले होते. मिळालेले मासे विकण्यासाठी ते निघाले होते. 

बातम्या आणखी आहेत...