आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • या मराठी IPS ऑफिसरची अशी आहे लव्ह स्टोरी Love Story Of IPS Officer Rahul Kumar Lodha

या मराठी IPS ऑफिसरची अशी आहे लव्ह स्टोरी, मुलीला प्रपोज करण्याआधी आईला सांगितली ही गोष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळचे एसपी राहुल कुमार लोढा मूळचे जळगावचे आहेत. - Divya Marathi
भोपाळचे एसपी राहुल कुमार लोढा मूळचे जळगावचे आहेत.

भोपाळ - भोपाळ साऊथचे एसपी राहुल कुमार लोढा यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा निर्णय BE केल्यानंतर घेतला होता. इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्यूएशन केल्यानंतर त्यांना मल्टिनॅशनल कंपनीत जॉब लागला, परंतु ही नोकरी त्यांनी जास्त दिवस केली नाही. आपल्या घरी राहताना त्यांच्या बालमित्रांशी गप्पांदरम्यान सिस्टिम (करंट मुद्दे) वरून वाद-चर्चा सुरू झाली, यावर मित्र म्हणाले की, जर तुला सिस्टिम चुकीची वाटते, तर तू स्वत: सिस्टिममध्ये जाऊन काही करत का नाहीस? बस. ही बाब त्यांच्या मनाला लागली. त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची तयारी सुरू केली आणि IPS बनले.


DivyaMarathi.Comशी बोलताना SP राहुल यांनी आपली लव्ह स्टोरी शेअर केली. ते म्हणाले की, ज्यांच्याशी त्यांचे लग्न झाले आहे, त्या त्यांचे पहिले प्रेम होत्या. आणि त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट होण्याआधी आपल्या आईला ही गोष्ट सांगितली होती. यानंतरच त्यांनी प्रपोझ केले होते.

 

अशी सुरू झाली लव्ह स्टोरी... 
- एसपी राहुल म्हणाले की, इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये एक स्कॉलरशिप मिळाली होती. याअंतर्गत त्यांची कोचिंग आणि राहणे फ्री होते. ते ज्या इमारतीत राहत होते, त्याच्या खालच्या मजल्यावर मुली आणि वर मुले राहायची.
- त्यांच्या पत्नी शुभी ज्या जोधपूरच्या रहिवासी आहेत, त्याही स्कॉलरशिपमध्ये सिलेक्ट झाल्या होत्या आणि दोघेही एकाच कोचिंगमध्ये जायचे. यामुळे दोघेही एकमेकांना ओळखायचे.
- दोघांमध्ये 2 वर्षे फ्रेंडशिप राहिली. त्यांनी अनेक वेळा आपसात नोट्सही शेअर केल्या होत्या.
- UPSC एक्झामच्या थर्ड अटेम्टनंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी आपल्या आईला शुभीबाबत सांगितले. यावर आई म्हणाली की, तुला मुलगी पसंत असेल तर तिच्याशी बोल आणि मग जे उत्तर येईल ते आम्हाला सांग.
- तेव्हा राहुल यांनी कॉल करून शुभी यांना प्रपोज केले, याच्या काही वेळाने तिने होकार दिले. मग दोघांनी एका महिन्याच्या आतच आपापल्या घरी याबद्दल सांगितले.
- काही दिवसांनी दोघांच्या कुटुंबीयांनी एकमेकांची भेट घेतली आणि लग्न पक्के केले. परंतु तोपर्यंत राहुल यांचा रिझल्ट आलेला नव्हता.
- खास बाब अशी की, जेव्हा राहुल यांचा रिझल्ट आला तेव्हा त्यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. ही माहिती त्यांच्या पत्नीनेच त्यांना दिली होती की, ते IPS साठी सिलेक्ट झाले आहेत.
- सिलेक्शननंतर त्यांची ट्रेनिंग सुरू झाली आणि काही दिवसांनी 2012 मध्ये ते आणि शुभी लग्नगाठीत अडकले.

 

आयटी इंजिनिअरही आहेत राहुल
- राहुल लोढा महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील बिझनेस करतात आणि आई गृहिणी आहेत.
- राहुल यांनी इयत्ता 10वी जळगावातून आणि 12वी तसेच BEचे शिक्षण पुण्यातून घेतले.
- 2008 मध्ये त्यांनी BE पूर्ण केली आणि त्यानंतर लगेच त्यांना IBM मध्ये जॉब लागला होता.
- त्यांनी जॉब करत-करतच 2009 पासून सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देणे सुरू केले. आणि शेवटी 2011 मध्ये सिलेक्ट होऊन IPS बनले.

 

गुरुद्वाऱ्यात काढली होती रात्र, असे केले होते स्वत:ला तयार
- राहुल जेव्हा IPS बनण्याच्या इच्छेने दिल्लीत गेले होते. तोपर्यंत त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीबद्दल त्यांना काही नॉलेज नाही.
- जेव्हा ते दिल्लीत पोहोचले तेव्हा त्यांनी चांदनी चौकातील गुरुद्वाऱ्यात रात्र काढली होती, यानंतर अनेक दिवस त्यांना धर्मशाळेतही राहावे लागले होते.
- कसेबसे लोकांना विचारत-विचारत ते कोचिंगपर्यंत पोहोचले, तेव्हा लेट अॅडमिशनचे कारण देऊन त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तरीही त्यांनी हार मानली नाही.
- ते कोचिंगमधून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकांबद्दल विचारायचे आणि ते टिपून घ्यायचे.
- याप्रकारे एक्झामचा अभ्यास करून ते एवढे तयार झाले की, कोणत्याही प्रश्नाबाबत ऐकताच ते सांगायचे की, कोणत्या वर्षीच्या पेपरमध्ये तो प्रश्न होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, IPS ऑफिसर राहुल लोढा यांचे आणखी फोटोज विथ फॅक्टस... 

बातम्या आणखी आहेत...