आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर - भारतात वेश्यावृत्ती बेकायदेशीर आहे. सरकारने वेळोवेळी वेश्यावृत्ती संपवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहे. मात्र अद्यापही देशाच्या काही भागात हे काम फक्त परंपरा म्हणून केले जाते. यात मध्यप्रदेशातील नीमच-मंदसौर आणि रतलाम सारख्या जिल्ह्यांमध्ये ही वाईट परंपरा आजही सुरु आहे. या जिल्ह्यातील बांछडा समाजात कित्येक वर्षांपासून वेश्यावृत्तीचा गंदा धंदा सुरु आहे. आश्चर्याची बाब म्हणजे समाजातील या घृणास्पद प्रकाराला या मुली एवढे सरावल्या आहेत की त्यांना यात काहीही गैर वाटत नाही.
बाप-भाऊ आणतात ग्राहक
- बांछडा समाजाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणजे त्यांच्या मुली आणि महिलांची वेश्यावृत्ती आहे. या समाजात मुलगी जन्माला आली तर मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो. कारण त्यांचे घर चालवण्यासाठी एक नवा सदस्य आलेला असतो.
- या समाजातील पुरुष महिलांनी वेश्यावृत्ती करण्यास कोणतीही हरकत घेत नाही. उलट ते या धंद्यात येण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही प्रथा-परंपरा सोपवली जाते.
- मुलगी 12-14 वर्षांची झाली की आई-वडीलच तिला या दलदलीत ढकलतात. एवढेच नाही तर भाऊ आणि वडील हेच मुलीसाठी कस्टमर घेऊन येतात. घरामध्ये फक्त याचसाठी एक रुम ठेवली जाते.
75 गावांमध्ये सुरु आहे 'धंदा'
- बांछडा समाज हा मध्यप्रदेशातील नीमच- मंदसौर, रतलाम मधील जवळपास 75 गावांमध्ये आहे. या समाजाची एकूण लोकसंख्या जवळपास 23,000 आहे. त्यातील 65 टक्के या महिला आहेत.
- नीमच-मंदसौर हायवेवर झगमगीत कपडे घालून या समाजाच्या मुली येणाऱ्या जाणाऱ्यांना आकर्षित करत असतात. त्यांचे भडक कपडे पाहूनच त्यांची ओळख होते.
- रस्त्याच्या शेजारीच यांनी बाज टाकलेली असते. यांचे बहुतेक ग्राहक हे ट्रक ड्रायव्हर आणि दुसऱ्या गावातील पुरुष असतात. यातून जेवढी कमाई होते त्यावरच यांच्या घरातील चूल पेटते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.