आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत BJP-काँग्रेसला 9-9 जागा, राघोगडवर काँग्रेसचा झेंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यप्रदेश भाजपचा गड मानला जातो. - Divya Marathi
मध्यप्रदेश भाजपचा गड मानला जातो.

भोपाळ - देशातील काही राज्य हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) गड मानले जातात. त्यात गुजरातनंतर मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो. येथे 19 स्थानिक स्वराज्य संस्था आणि 17  पंचायत समिती निवडणूक निकालाची शनिवारी घोषणा झाली. 19 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 9 ठिकाणी विजय मिळाला आहे तर एक पालिका अपक्षांच्या ताब्यात गेली आहे. 6 नगर पालिकांपैकी फक्त 2 वर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर काँग्रेसने 4 नगर पालिका आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. 13 नगर परिषदांच्या जागांपैकी भाजपला 7 तर काँग्रेसने 3 वर विजय मिळवला आहे. एका ठिकाणी अपक्ष विजयी झाला आहे. 

6 नगर पालिका आणि 13 नगर परिषदांसाठी 17 जानेवारी रोजी मतदान झाले होते. शनिवारी सकाळी 9 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. 

 

भाजपने जिंकल्या 9 जागा 
- पीथमपुर, ओंकारेश्वर, कुक्षी, डही, धामनोद, पानसेमल, राजपुर, सेंधवा आणि पलसूद.

काँग्रेसचा 9 ठिकाणी विजय 
- धरमपुरी, धार, मनावर, राजगढ़, सरदारपुर, अंजड़, खेतिया, बड़वानी आणि राघौगड-विजयपुर येथे काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. 

अनूपपूरमध्ये अपक्ष विजयी 
- अनुपपूर जिल्ह्यातील जैतहरी जागेवर अपक्ष उमेदवार नवरत्नी शुक्ला विजयी झाल्या आहेत, त्यांनी भाजपच्या सुनीता जैन यांचा पराभव केला. 
- नवरत्नी या 898 मतांनी विजयी झाल्या आहेत. 

 

अकोडामध्ये जनतेने दाखवला अध्यक्षांवर विश्वास 
- भिंड जिल्ह्यातील अकोडा नगर परिषदेच्या जागेवर बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) संगीत यादव यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने यादव यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यानंतर राइट टू रिकॉलसाठी मतदान घेण्यात आले होते. संगीता यादव 676 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता.

 


राघोगडवर काँग्रेसचा झेंडा 
- गुना जिल्ह्यातील राघोगड नगर पालिकेवर काँग्रेस उमेदवार आरती शर्मा विजयी झाल्या आहेत. 
- राघोगड हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा गड मानला जातो. 50 वर्षांपूर्वी राघोगड नगर पालिका निवडणुकीत अध्यक्षपदी विजयी होऊन दिग्विजयसिंह राजकारणात सक्रीय झाले होते. 
- काँग्रेस उमेदावर आरती महेंद्र शर्मा या 5672 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 17 हजार 613  मते मिळाली. आरती शर्मा यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या मायादेवी अग्रवाल यांना 12 हजार 32 मते मिळाली. अपक्ष ऋतू भार्गव यांना 780 तर शमीम बानो यांना 313 मते मिळाली.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, काँग्रेसने किती जागा जिंकल्या...  

बातम्या आणखी आहेत...