आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉलमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर पाशवी कृत्य, मॉलच्या कर्मचाऱ्याने नेले होते अंधाऱ्या कोपऱ्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनेनंतर आईसोबत चिमुकली काळ्या वर्तुळात. - Divya Marathi
घटनेनंतर आईसोबत चिमुकली काळ्या वर्तुळात.

इंदूर - टीआय (ट्रेजर आयलँड) मॉलच्या पाचव्या मजल्यावरील व्हर्चुअल गेम झोनमध्ये गुरुवारी संध्याकाळी मुझ्यिकचा जोरदार आवाज... मास्क आणि चष्मा लावलेली मुले अंधाऱ्या रूममध्ये गेम खेळण्यात दंग होते. तेवढ्यात 9 वर्षांच्या एका मुलीची किंकाळी ऐकू आली. मुलीच्या 12 वर्षांच्या भावासहित सर्व मुलांना वाटले की, ती गेमला भ्यायल्यामुळे ओरडत असेल, पण हकिगत एवढी भयंकर होती की, ज्यानेही ऐकली त्याला प्रचंड धक्का बसला. चिमुकलीला तेथेच काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हाताने पकडून एका कोपऱ्यात नेले व तिच्याशी कुकृत्य करू लागला. त्याचे कृत्य एवढे भयंकर होते की, फरशीवर रक्त सांडले. चिमुकली रडतच बाहेर आली. तिने वेदनांनी विव्हळत कर्मचारी अर्जुनकडे इशारा केला. तेव्हा आईने लगेच त्याला पकडून चापटा मारायला सुरुवात केली. तेथे उपस्थित इतरांना जेव्हा या कृत्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्या कर्मचाऱ्याला चांगलीच मारहाण केली. पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली. मुलीचे शहरातील एका हॉस्पिटलमध्ये मेडिकल करण्यात आले आहे.


प्रचंड हादरली चिमुकली 
- चिमुकली त्या नराधमाच्या कृत्यामुळे एवढी हादरली की, जेव्हा मॉलचे बाउन्सर तिच्याजवळ आले तेव्हा तिचा धीर सुटला. ती ओरडू लागली, "आई, प्लीज यांना माझ्यापासून दूर कर... मला खूप भीती वाटतेय..." 
- आईने मुलीला छातीला कवटाळले आणि ओरडतच बाउन्सर्सना दूर जाण्यासाठी सांगितले.

 

चिमुकली ओरडली तेव्हा भावाला वाटले ती गेमच खेळत आहे... 
- जुन्या इंदूर परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची पत्नी आपली 9 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षांच्या मुलाला घेऊन ट्रेझर आयलँडमध्ये फिरायला गेल्या होत्या. त्या मॉलमध्ये फिरत असताना पाचव्या मजल्यावरील प्ले झोनमध्ये गेल्या.
- मुलांनी हट्ट केला होता की वरच्या मजल्यावरील व्हर्च्युअल गेम झोनमध्ये जायचे आहे. तेथे चष्मा आणि मास्क लावून लोक जातात. मुलांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आई तेथे घेऊन गेली.
- भाऊबहिणीने तिकीट घेतले, मास्क आणि चष्मा लावून आत गेले. आपापला गेल खेळण्यासाठी भाऊबहीण एकमेकांपासून दूर झाले होते.
- म्युझिकच्या मोठ्या आवाजात मुले अंधाऱ्या रूममध्ये गेम खेळत होते. तेवढ्यात चिमुकलीच्या मोठी किंकाळी ऐकू आली. तिच्या 12 वर्षांच्या भावासह सर्व मुलांना वाटले की, ती गेमची भीती वाटल्याने ओरडत आहे, पण हकिगत भयंकर होती.

 

पोलिस व्हेरिफिकेशन नसतानज्ञ मॉलमध्ये काम करत होता आरोपी
- सीएसपी म्हणाले, "गेमिंग झोनच्या कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन नसल्याची बाब समोर आली आहे. आम्ही याचा सखोल तपास करत आहोत, कडक कारवाई करू." 
- दुसरीकडे घटनेबद्दल जेव्हा टीआई मॉलचा मालक पिंटू छाबड़ा यांच्याशी संपर्क साधण्यात आला तेव्हा सांगण्यात आले की ते सुरतमध्ये गेले आहेत. मॉलमध्ये चिमुकलीवर एवढे पाशवी कृत्य झाल्यामुळे त्यांनाही धक्का बसला आहे. यासाठी त्यांनी गेमिंग झोन कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  
- मॉलचे मालक छाबडा म्हणाले, मॉलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पोलिस व्हेरिफिकेशन आहे. जर गेमिंग झोनमधील कर्मचाऱ्याचे पोलिस व्हेरिफिकेशन झालेले नसेल तर यासाठी नक्कीच कडक कारवाई केली जाईल. पोलिसांनी आरोपी तरुणासोबत गेम झोनच्या मॅनेजमेंटवरही कडक कारवाई केली पाहिजे.

 

मॉलमध्ये यापूर्वीही एका विद्यार्थिनीवर झालेली आहे घटना
याच मॉलमध्ये यापूर्वीही 11 वीच्या एका विद्यार्थिनीसोबत घटना घडलेली आहे. अन्नपूर्णा परिसरात राहणारी विद्यार्थिनी कपडे खरेदीसाठी मॉलमध्ये गेली होती. ती चेजिंग रूममध्ये कपड़े बदलत होती. यादरम्यान तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने चेंजिंग रूममध्ये मोबाइल फोन ठेवून तिचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीला याची माहिती मिळाली तेव्हा तिने आरडाओरड केली. यानंतर तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...