आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: रुग्णालयाने नाकारली अॅम्ब्युलेन्स, पोस्टमॉर्टमसाठी तरुणाने मोटारसायकलवर नेली आईची Dead body

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिकमगढ (मध्य प्रदेश) - मृत आईच्या पोस्टमॉर्टमसाठी तरुणाने मृतदेह मोटारसायकलवरच सरकारी रुग्णालयात नेल्याची घटना समोर आली आहे. वृत्तसंस्थेनुसार, टिकमगढ सरकारी रुग्णालयात तरुणाच्या आईचे निधन झाले होते. रुग्णालयापासून पोस्टमॉर्टम रूममध्ये मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयाने शववाहिनी नाकारली. उशीर होत असल्याने नाइलाजाने तरुणाने आईचा मृतदेह मोटारसायकलवर टाकून तो पोस्टमॉर्टम रुममध्ये नेला. या घटनेचा व्हिडिओ वृत्तसंस्थेने जारी केला आहे. 

मोहनगढ सरकारी रुग्णालयाने शववाहिनी देण्यास नकार दिल्यामुळे तरुणाला हे पाऊल उचलावे लागले. बेजबाबदार रुग्णालय प्रशासनावर चहुकडून टीकेची झोड उठली आहे. प्रकरण उजेडात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...