आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Triple Murder: पत्नीसह 2 मुलींना गोळ्या घातल्या; Suicide करताना झाली अटक, मग केला धक्कादायक खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दतिया (मध्य प्रदेश) - येथील इंदरगड परिसरातील तिहेरी हत्याकांडने खळबळ उडाली आहे. एका बापाने आपल्या पत्नी आणि दोन मुलींना डांबून गोळ्या घालून संपवले. एवढ्यातही त्या नराधमाचे मन भरले नाही. त्याने शूट केल्यानंतरही देसी कट्ट्याच्या बटने त्यांना मारण्यास सुरुवात केली. अचानक झालेले फायरिंगचे आवाज आणि आरडा-ओरड एकूण दुसऱ्या मजल्यावरील नातेवाइक धावून आले. खिडकीतून आत पाहिले तेव्हा चिमुकल्या मुलींचे देह रक्तरंजित अवस्थेत पडले होते. यानंतर सर्वांनी दार वाजवला. आतून दार उघडताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. नातेवाइकांनीच गंभीर जखमी अवस्थेत तिघ्या मायलेकींना रुग्णालयात उपचारासाठी नेले. यातील 5 महिन्यांच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या पत्नी आणि दुसऱ्या मुलीवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. 


आरोपी म्हणाला, 2 मित्रांच्या मृत्यूने तणावात होतो
पोलिस अधीक्षक मयंक अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदरगडच्या मोनू झा या युवकाला अटक करण्यात आली आहे. त्याने आपल्या पत्नीसह दोन्ही मुलींना गोळ्या घातल्या. यातील एका मुलीचा मृत्यू झाला असून यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहे. आरोपीने सांगितल्याप्रमाणे, "दोन मित्रांच्या मृत्यूने मी तणावात होतो. त्यामुळेच, आपल्या कुटुंबाला संपवून स्वतः देखील आत्महत्या करणार होतो. परंतु, बंदूकीत गोळ्याच संपल्या. अन्यथा स्वतःच्या डोक्यात गोळी घातली असती. गोळ्या संपल्याने मी ट्रेनखाली जाऊन झोपणार होतो. तेवढ्यात पोलिसांनी मला अटक केली."

 

'आयुष्य बरबाद झाले होते...'
- आरोपी मोनू पुढे म्हणाला, 20 एप्रिल रोजी काळरात्रीने माझ्या आयुष्यात नेहमीचा आंधार केला. त्या रात्री मी, माझा मित्र अंकित उर्फ छोटू आणि टिंकू प्रजापती हॉटेलमधून जेवून रात्री 2 वाजता घरी येत होतो. गाडी मी चालवत होतो. 
- त्याचवेळी वाहनाचा तोल गेला आणि वाहन थेट डिव्हायडरला जाऊन भिडले. दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तसेच मी गंभीर जखमी झालो होतो. ग्वाल्हेर येथे माझ्यावर उपचार झाले. त्यात पैसाही खूप खर्च झाला. माझे दोन्ही हात गेले (मित्र) तेव्हापासून काहीच करण्याच्या लायकीचा राहिलेलो नाही. त्यामुळेच, सर्वांना मारून मी आत्महत्या करणार होतो. हे सांगताना तो पोलिस स्टेशनमध्ये धायमोकलून रडत होता.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...