आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदसौरमध्ये चिमुरडीवर निर्भयासारखे अत्याचार; प्राण वाचवण्यासाठी आतडे कापावे लागले, चेहऱ्यावर चावल्याच्या खुणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- चिमुरडीला शाळेच्या गेटपासून बहाण्याने घेऊन गेला होता आरोपी.
- चिमुरडीची प्रकृती चिंताजनक, नाकावरही एवढ्या गंभीर जखमा की, श्वास घेण्यासाठी टाकावी लागली नळी.

 

इंदूर - मंदसौरमध्ये शाळा सुटल्यानंतर 7 वर्षीय बालिकेचे अपहरण करून पाशवी बलात्कार करण्यात आला. तिच्यावर एवढे अत्याचार झाले की पाहून डॉक्टरही हादरले. वेदनांनी विव्हळत असलेली चिमुरडी फक्त काही काळासाठी डोळे उघडत आहे. उशाला बसलेले वडिलांना फक्त एवढेच म्हणाली की, तो माझा हात पकडून घेऊन गेला होता. दुसरीकडे, आईचे रडूनरडून हाल झाले आहेत, ती तिच्याकडे एकटक पाहत राहते. पीडित बालिकेच्या चेहऱ्यावर अनेक जागी चावे घेतल्याने जखमा झाल्या आहेत. रॅक्टम (गुद्दद्वार) पूर्णपणे फाटले, तर प्रायव्हेट पार्ट रक्तबंबाळ होते.

 

डॉक्टरही हादरले पाहून अवस्था...

ही घटना मंगलवारी संध्याकाळची आहे. पीडितेला मंदसौर जिल्हा रुग्णालयातून बुधवारी संध्याकाळीच इंदूरच्या एमवाय रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे रात्रीतूनच डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागले. आतडे कापून बाहेर एक मार्ग काढून प्रायव्हेट पार्ट्सवर उपचार करण्यात आले. नाकावर खोल जखमा झाल्याने तिला श्वास घेण्यासाठी नळी लावावी लागली. चेहऱ्यावरच्या जखमांसाठी ल्यूकोप्लास्टी करण्यात आली. या पाशवी घटनेच्या निधेर्षात गुरुवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मोठ्या प्रमाणावर संतप्त लोक जमल्याने पोलिसांना आरोपी इरफान खानला कोर्टात हजर करता आले नाही. संध्याकाही पोलिसांनी न्यायाधीशांना विनंती केली. यानंतर कोर्ट स्वत:च कंट्रोल रूममध्ये आले, येथे इरफानला 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

 

कुटुंबीयांनाही कुणाशी भेटायला मनाई
चिमुरडीवर उपचार करणारे डॉ. ब्रजेश लाहोटी म्हणाले की, बालिकेला अतिशय गंभीर जखमा आहेत. प्रायव्हेट पार्ट्सना संक्रमित होण्यापासून वाचवण्यासाठी आणि रॅक्टममधून मोशन पास व्हावी यासाठी आतडे कापून बाहेरून मार्ग (कोलेस्टोमी) करण्यात आला. एक युनिट रक्तही चढवण्यात आले. प्रकृती सध्या स्थिर आहे. तिला थोडे-थोडे पाणी पाजण्याची परवानगी आहे. एवढीशी ही पोर अजूनही धक्क्यात आहे, तिला यातून बाहेर पडायला बराच काळ जाऊ द्यावा लागेल.

हा वॉर्ड काचेच्या भिंतींनी दोन भागांत विभागण्यात आला आहे. पीडितेजवळ 2 पोलिस तैनात आहेत. 2 वॉर्डात आणि 2 वॉर्डाबाहेर पहारा देत आहेत. कुटुंबालाही कुणाला भेटू दिले जात नाहीये. आईवडील आपल्या लाडक्या लेकीचे डोळे उघडण्याची वाट पाहत आहेत. रात्रीपासून सकाळपर्यंत पलंगावर एक कुशी बदलून ती थिजल्यासारखी पडून होती. 

 

वडील म्हणाले- त्या दिवशी शाळेत जायला 15 मिनिटे उशिरा झाला
पीडित बालिकेचे वडील म्हणाले की, माझी मुलगी थोड्या वेळासाठी डोळे उघडते, परत झोपी जाते. तिने मला ओळखले. फक्त एकदाच बोलली. ते पुढे म्हणाले की, त्या दिवशी मला 15 मिनिटे उशीर झाला होता. संध्याकाळी 5.45 वाजता शाळेत गेलो, तर मुलगी आढळली नाही. पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्या नराधमाने माझ्या मुलीसोबत असे केले, त्याला भरचौकात फाशी दिली, तरच आम्हाला समाधान मिळेल.

 

सीसीटीव्ही कॅमेरा होता बंद 

पीडिता सरस्वती शिशुमंदिरमध्ये शिकते. आरोपी तिला शाळेच्या गेटपासूनच बहाण्याने आपल्यासोबत घेऊन गेला होता. शाळेचे गेट कव्हर करण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे, परंतु घटनेदरम्यान तो बंद होता. घटनेच्या वेळी सुरक्षा गार्डही पार्कमध्ये गेलेला होता. मुख्याध्यापक म्हणाले की, कर्मचाऱ्याने सफाईदरम्यान लाइट बंद करताना कॅमेऱ्याचे स्विचही बंद केले. अनेकांना शाळेचे हे म्हणणे पटलेले नाही. शाळेतील काही विद्यार्थ्यांचे पालक असेही म्हणाले की, शाळा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नराधमाचे फावले. गेटवर कॅमेरा बंद आणि चौकीदारही गायब, असे कसे होऊ शकते. यामागे एखादे षडयंत्रही असू शकते?

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos..    

 

बातम्या आणखी आहेत...