आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर - महिला पोलिस स्टेशनमध्ये नेहमीच अफेअर, छळ, लिव्ह-इन रिलेशनशिप अशी प्रकरणे येतात. परंतु बुधवारी शहरातील महिला पोलिस स्टेशनमध्ये अजब प्रकरण समोर आले. एका महिलेने पोलिसांना म्हटले की, तिला तिचा पति अन् प्रियकर दोघांसोबतही राहायचे आहे. तिचे बोलणे ऐकून पोलिसही बुचकळ्यात पडले. तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिने ऐकले नाही. महिलेच्या प्रियकराला पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले आणि मग तो तयार झाला.
- इंदूरच्या महिला पोलिस स्टेशनमध्ये एक महिला गेली आणि रडत-रडतच तिने पोलिसांना सांगितले की, तिला तिच्या पतीने मारहाण करून घराबाहेर काढून दिले आहे. पोलिसांनी जेव्हा तिला कारण विचारले की, तुझ्या पतीने तुला का मारले आहे? तर तिने काहीच उत्तर दिले नाही, फक्त रडत राहिली.
- पोलिसांनी महिलेच्या पतीला बोलावून मारहाणीचे कारण विचारले. पती म्हणाला- त्याच्या पत्नीचे एका तरुणाशी अवैध संबंध सुरू आहेत. तो जेव्हा कामावर जातो, तेव्हा पत्नी तिच्या प्रियकराला भेटायला जाते. या गोष्टीवरून दोघांमध्ये नेहमीच वाद होतात.
- मी अनेक वेळा पत्नीला त्याला भेटायला मनाई केली, परंतु ती ऐकत नाही. बुधवारी मी पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडले. यामुळेच आता तिला मारहाण करून घराबाहेर काढले.
- पोलिसांनी जेव्हा महिलेला विचारले तेव्हा ती म्हणाली- हो, तिचे एका तरुणावर प्रेम आहे. नेहमी त्याला भेटायलासुद्धा जाते. पोलिसांनी तिची समजूत घातली की, त्याला सोडून दे आणि आपल्या पतीसोबत राहा. परंतु महिलेने नकार दिला.
- तिचे म्हणणे होते की, तिला पती आणि प्रियकर दोघांसोबतही राहायचे आहे. पोलिसांनी खूप समजावल्यानंतरही ती ऐकली नाही, तेव्हा पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला बोलावले आणि त्याला समज दिली. यानंतर प्रियकराने त्या महिलेला कधीही न भेटण्याचे वचन दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.