आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या छतावर चढला तरुण, हायटेंशन तारेमुळे एवढा भाजून निघाला- पाहा Video...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर/उज्जैन - एक तरुण डिझेलने भरलेल्या मालगाडीच्या छतावर चढला तेव्हा रेल्वे स्टेशनवर मोठी खळबळ उडाली. छतावर चढल्यानंतर तरुणाचा हायटेंशन वीजतारेला स्पर्श झाला, वीज बंद करेपर्यंत तो गंभीररीत्या भाजला गेला होता. अथक प्रयत्नांनंतर आरपीएफ आणि जीआरपी पथकाने त्याला खाली उतरवले आणि रुग्णालयात नेले. तरुणाची प्रकृती चिंताजनक झाली आहे. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भयंकर अपघाताचे आणखी फोटोज व शेवटी घटनेचा व्हिडिओ...

 

- आरपीएफ प्रभारी हर्ष चौहान म्हणाले की, अपघातग्रस्त तरुण कुंदन राजपूत हा निजातपुरा, उज्जैनचा रहिवासी असून त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. तो उज्जैनमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीवर चढला होता, येथून तो मालगाडीच्या छतावर पोहोचला त्याला उच्चदाबाच्या विजेचा मोठा शॉक बसला.
- चौहान म्हणाले, डिझेलने भरलेल्या मालगाडीला शॉर्टसर्किटमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. कारण कोच पूर्णपणे लॉक होते. जर आग जास्त भडकली असती तर मोठा अनर्थ घडला असता, परंतु वेळेवरच सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- प्लॅटफॉर्म एकजवळ रिकामे रूळ आहेत, यावर मालगाडी येऊन थांबते. शुक्रवार संध्याकाळीही या रुळावर  एक डिझेलने भरलेली मालगाडी येऊन थांबली. रेल्वे थांबताच रेल्वे पोलिस स्टेशनपासून काही अंतरावरच एक तरुण शिडी चढून मालगाडीच्या छतावर गेला. छतावर उभा राहताच त्याचा हायटेंशन वीजतारेला स्पर्श झाला आणि त्याच्या कपड्यांनी पेट घेतला.
- उच्चदाबाच्या विद्युत प्रवाहामुळे तरुणाचे शरीर गंभीररीत्या भाजले आणि मोठ्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली होती. यानंतर आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त रेस्क्यू मोहिमेमुळे डब्याच्या दोन्ही बाजूंची वीज बंद करण्यात आली. तरुण एवढा गंभीररीत्या भाजला की, त्याला ओळखणेही कठीण झाले. कसेबसे त्याला खाली उतरवण्यात आले.

- कोचवरून त्याला उतरवूनही रेस्कू ऑपरेशन पूर्ण झाले नाही. रुळावर उतरवताच तत्काळ त्याचे कपडे फाडण्यात आले आणि त्याला रुग्णालयात पोहाचवण्यात आले. गंभीर भाजल्यामुळे त्याला एमवाय रुग्णालय इंदूरला पाठवण्यात आले.

(फोटो- शाहिद खान)

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भयंकर अपघाताचे आणखी फोटोज व शेवटी घटनेचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...