आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Minor Girl Gang Raped 2 Times In A Day All 5 Accused Arrested Latest News And Updates

Shocking: एकाच दिवसात 2 वेळा अल्पवयीन मुलीवर गँगरेप, सर्व 5 आरोपींना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छिंदवाडा (मध्य प्रदेश) - येथील महुआ टोला जंगलात एका 14 वर्षीय मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा कथितरीत्या सामूहिक बलात्काराची घटना उजेडात आली आहे. आधी दोन जणांनी तिच्यावर बलात्कार केला, त्यांच्या तावडीतून सुटून ती जेव्हा घरी जात होती तेव्हा आणखी 3 जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. 

 

असे आहे प्रकरण
अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीरज सोनी म्हणाले की, "14 वर्षीय चिमुरडीवर 7 जुलै रोजी एकाच दिवसात 2 वेळा सामूहिक बलात्कार झाला आहे. आधी दोन जणांनी महुआ टोलाच्या जंगलात बनलेल्या एका झोपडीत तिच्यावर बलात्कार केला आणि जेव्हा ती त्यांच्या तावडीतून सुटून घरी जात होती, तेव्हा आणखी तीन जणांनी तिला पकडले आणि त्याच झोपडीत नेऊन सामूहिक बलात्कार केला." 

 

ही आहे आरोपींची नावे
पोलिसांनी सांगितले की, आरोपींची ओळख पटली असून मोहित भारद्वाज (22), राहुल भोंडे (24), बंटी भलावी (23), अंकित रघुवंशी (25) तसेच अमित विश्वकर्मा (21) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी छिंदवाडा शहरातील महुआ टोला परिसरातील रहिवासी आहेत.

 

आईला न सांगता घराबाहेर पडली होती मुलगी

पोलिस म्हणाले की, या पाचही आरोपींना आज अटक करण्यात आली आहे. ते म्हणाले की, पीडितेला मोहित भारद्वाजने फोन करून बहाण्याने आपला साथीदार राहुल भोंडेच्या जंगलात बनलेल्या झोपडीत नेले होते. अल्पवयीन मुलगी आपल्या आईला न सांगता 6 जुलैला घरातून निघाली होती. रात्री उशीर होऊनही ती न आल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार 7 जुलै रोजी कुंडीपुरा पोलिसांत दिली होती, यानंतर 8 जुलै रोजी पीडिता महुआ टोला परिसरात आढळली. तेव्हा तिने पोलिसांना सर्व हकिगत सांगितली.

आरोपींवर भादंवि कलम 376-डी, 506, 363, 342 तसेच पॉक्सो अॅक्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत वापरलेले दुचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.  

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित माहिती व Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...