आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भारतात येथे तयार झाली होती सौंदर्यवती राणीची ममी, पाहा इतिहातासातील Unknown Facts Mumtaj Mahal Tombs Unknown Facts

भारतात येथे तयार झाली होती सौंदर्यवती राणीची ममी, पाहा इतिहातासातील Unknown Facts

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यात जवळपास 384 वर्षांपूर्वी भारतातील सर्वात सुंदर महिला आणि मुगल बादशाह शाहजहांची पत्नी मुमताजची ममी प्रथमच बनविण्यात आली होती. बऱ्हाणपूर जिल्ह्यातील जैनाबादमध्ये मुमताजची खरी कबर आहे. चौदाव्या बाळांतपणात मुमताजचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बऱ्हाणपूरमध्येच तिचा दफनविधी झाला. सहा महिन्यानंतर मुमताजची ममी आगऱ्यात नेण्यात आली आणि जवळपास 22 वर्षांनंतर मुमताजची ममी ताजमहालात ठेवण्यात आली.


इतिहासकारांच्या मते 1631 मध्ये मुमताजच्या मृत्यूनंतर तिची ममी बनवून जैनाबादमध्येच दफन करण्यात आली. काही वर्षांपर्यंत हा प्रश्न सतावत होता की मुमताजच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह एवढे दिवस कसाकाय सुरक्षीत ठेवण्यात आला आणि एवढ्या दूर कसा नेता आला. यासंबंधी जामिया हमदर्द विद्यापीठाच्या म्यूझियम ऑफ हिस्ट्री ऑफ मेडिसनचे क्यूरेटर अमानुल हक यांनी एका शोध निबंधाद्वारे त्यावरील रहस्य उलगडले होते. त्यांच्या मते मुमताजचे शरीर युनानी पद्धतीने सुरक्षीत करण्यात आले होते. काही इतिहासकारांचे मत आहे, की तत्कालीन परिस्थितीत मुगल बादशाहाकडे ममी कशी तयार केली जाते याचे जाणकार होते.


पुढील स्लाइडमध्ये, मुमताजच्या ममीची पूर्ण कथा  

बातम्या आणखी आहेत...