आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षांच्या चिमुकलीची रेपनंतर गळा दाबून हत्या, अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्य प्रदेशात पुन्हा एकदा एक चिमुकली पाशवी अत्याचारांची बळी ठरली. रेप केल्यानंतर चिमुकलीची गळा दाबून हत्या करण्यात आली. ही घटना छतरपुरच्या भुरापुरवा येथील आहे. येथे 9 वर्षीय बालिका शेतात बोरे तोडायला गेली होती, परंतु संध्याकाळी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. यादरम्यान त्यांना शेतातच चिमुकलीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला.

- चिमुकलीच्या गळ्यावर खुणा आढळल्या आहेत, यामुळे तिची रेपनंतर गळा दाबून हत्या केल्याचे दिसते.
- घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे.
- चिमुकलीचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आणि रेपच्या आरोपीचा शोध सुरू केला आहे.

 

अशी गायब झाली होती चिमुकली..
-ही घटना गौरिहार येथील भूरा पुरवा गावातील आहे. येथे तुरीच्या शेतात अर्धनग्नावस्थेत 9 वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला. सूत्रांनुसार, मुलगी आपल्या शेतात बोरे तोडायला गेली होती, येथेच तिच्यावर पाशवी अत्याचार होऊन तिची हत्या करण्यात आली. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...