आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर - 'तू प्यार है किसी और का...' या गाण्याचे नवीन व्हर्जन सध्या यू-ट्यूबवर जोरदार हंगामा करत आहे. या गाण्यामागे कोणतेही मोठे किंवा प्रसिद्ध नाव नाही. हा व्हिडिओ खंडवा जिल्ह्यातील किल्लौद येथे राहाणाऱ्या गावातील काही मुलांनी तयार केला आहे. कोणतेही प्रसिद्ध नाव व्हिडिओसोबत जोडलेले नसताना हा व्हिडिओ दोन दिवसांमध्ये 9 लाख लोकांनी पाहिला आहे. 5 मिनिट 26 सेकंदांचा हा व्हिडिओ किल्लौद येथे राहाणाऱ्या नरेंद्रसिंह पवारने तयार केला आहे. त्याच्यासोबत या व्हिडिओमध्ये त्याचे मित्र मुकेश माल्या आणि नैना गुर्जर यांनी काम केले आहे.
- नरेंद्र पवारने सांगितले, की व्हिडिओचे शुटिंग खिरकिया येथे खंडवा रोडजवळील एका कॉलनीत आणि काही भाग किल्लौद येथील काही ठिकाणी करण्यात आली.
- कमलेश डोडेने दिग्दर्शित केलेल्या या व्हिडिओमध्ये किल्लौद येथे राहाणारी नैना गुर्जरने भूमिका केली आहे. ती सध्या इंदूरला 11वीमध्ये आहे. नरेंद्र पवार याचे शिक्षण 10वीपर्यंत झालेले आहे. त्याने सांगितले की याआधी त्याने यारा तेरी यारी को... या गाण्यावर व्हिडिओ तयार केला होता.
शेतकरी कुटुंबातील सर्व मुलं
- व्हिडिओचा डायरेक्टर कमलेशने सांगितले, की त्याने खंडवा येथील भगवानपूर येथून आयटीआय केले आहे.
- आयटीआय करत असतानाच काही तरी वेगळे करण्याचे मनात होते. जुनी गाणी ऐकण्याची सवय आहे त्यासोबतच काही मित्र अॅक्टिंग करतात. त्यांना घेऊन एखादा व्हिडिओ तयार करण्याचे ठरवले आणि तू प्यार है किसी और का.. हे गाणे तयार झाल्याचे त्याने सांगितले.
दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर तयार झाला व्हिडिओ..
- कमलेश म्हणाला, व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्ही कोणतेही मोठे लोकेशन निवडले नाही तर गावातीलच गल्ली बोळांमधील लोकशेन सलेक्ट केले. त्यासाठी दोन महिने फिरत होतो.
- दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर 12 जानेवारीला व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला.
व्हिडिओ तयार करणे सोपे नव्हते..
- कमलेशने सांगितले की व्हिडिओ तयार करणे सोपे नव्हते. सर्वात मोठी अडचण ही पैशांची होती. आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातील. कोणाकडेही मनी नाही. त्यानंतर दुसरी समस्या व्हिडिओ तयार करण्यासाठी कॅमेरा पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन थोडे-थोडे पैसे गोळा केले. कॅमेराचे काम आमचा मित्र शिवम सिंहने केले. त्याच्या मदतीनेच हे शक्य झाले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओतील काही स्क्रिन शॉट्स...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.