आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • One Sided Lover High Voltage Drama In Bhopal Mp Mother Help Police Inaction For All This

माथेफिरूच्या दहशतीत 12 तास: आई म्हणते- आधीच पोलिसांनी कडक कारवाई केली असती, तर माझ्या मुलीची ही दशा झाली नसती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतीचे ते 12.30 तास : विभाच्या आई चंदा श्रीवास्तव म्हणाल्या- फॉर्चून डिवाइन सिटीच्या 5व्या मजल्यावर रोहित सकाळी 6.30 वाजता रिटायर्ड एजीएमच्या घरात दाखल झाला आणि त्यांच्या मुलीला त्याने बंदुकीच्या धाकावर कैद केले...

 

भोपाळ - फॉर्च्युन डिव्हाइन सिटीमध्ये माथेफिरू रोहित सिंहच्या या कृत्यामुळे देशभरात खळबळ उडाली. कॉलनी दिवसभर लोकांनी भलीमोठी गर्दी जमली होती. पोलिस दिवसभर माथेफिरूची समजूत काढत होते, कारण त्याच्या ताब्यात विभा कैदेत होती, तिचे आयुष्य पणाला लागले होते. यादरम्यान, विभाच्या आईने पोलिसांवर कडक कारवाई न केल्याचा आरोप केला, तेव्हा पोलिसांनी तो फेटाळून लावला. रात्री उशिरा तेच झाले, जे काम पोलिसांनी कायद्यानुसार करायला पाहिजे होते. रोहितविरुद्ध गंभीर कलमांमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. आता शनिवारी त्याची धिंडही काढली जाणार आहे.

 

कहाणीत ट्विस्ट...
पोलिसांना दिलेल्या जबाबात तरुणी म्हणाली की, "रोहितला जेल झाली पाहिजे, नाहीतर तो मला जिवंत ठेवणार नाही. या आधारे रोहितविरुद्ध जीवघेणा हल्ला करणे, बंधक बनवणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआयनेही रोहितविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे."

 

पोलिसावरच केला कात्रीने हल्ला
रोहितने मला मोबाइल फोनचा चार्जर मागितला. चार्जर देताना थोडासा दरवाजा उघडला. त्याच्या हातात गावठी पिस्तूल होते. मी हात आतमध्ये घालून त्याचा कट्टा पकडला. तेवढ्यात त्याने दुसऱ्या हातात घेतलेल्या कात्रीने माझ्या हातावर वार केला. कात्री हातात घुसली.
- जी.एस. राजपूत, एसआय, मिसरोद पोलिस स्टेशन


5 महिन्यांपासून त्रास देत होता रोहित, पोलिसांनी काहीच केले नाही

माझ्या मुलीशी रोहितची 3 वर्षांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. आता रोहित तिला त्रास देत आहे. 28 फेब्रुवारीला तो मुलीचा पाठलाग करत आमच्या कॉलनीपर्यंत आल्यावर त्या दोघांच्या मैत्रीबाबत कळले. त्याला 4-5 दिवसांपूर्वी कॉलनीतील लोकांनी रेकी करताना पाहिले होते. मी दार उघडल्यावर तो म्हणाला, मी तुमच्या मुलीचा फ्रेंड आहे. आत आला आणि मुलीला छतावर चलण्यासाठी सांगू लागला. मी आणि छोटी मुलगीही सोबत गेलो. येथे त्याने आम्हाला गावठी कट्टा दाखवून बंधक बनवले. 4 तास आम्ही तेथेच अडकून होतो. टॉयलेट आल्यावर म्हणायचा, येथेच करा. यानंतर दोन्ही मुलींना लिफ्टच्या मार्गाने ग्राउंड फ्लोरवर घेऊन गेला. नंतर कॉलनीच्या गेटबाहेर गेला. दुसऱ्याच दिवशी आम्ही मिसरोद पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पूर्ण घटनाक्रम सांगितला, परंतु पोलिसांनी फक्त घरात घुसून मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या कलमांमध्ये केस दाखल केली. दोन दिवसांतच त्याला जामीन मिळाला. तेव्हापासूनच तो चिडलेला होता. जर तेव्हाच रोहितविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई केली असती, तर आज माझ्या मुलीची ही दशा झाली नसती. 
- चंद्रा श्रीवास्तव, विभाच्या आई

 

पोलिसांचा तर्क...
त्या वेळी तरुणीने रोहितविरुद्ध असा जबाब दिला नव्हता. 18 दिवसांपूर्वीही फेसबुकवर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये तिने रोहितला आपला मित्र असल्याचे सांगितले. जर तिने या बाबी पोलिसांना सांगितल्या असत्या, तर जरूर गंभीर कलमांमध्ये गुन्हा दाखल झाला असता. 
- धर्मेंद्र चौधरी, डीआयजी

 

पंजाब मेलने सकाळीच आला भोपाळला
विभाच्या आईवडिलांना याचे आश्चर्यच वाटत आहे की, रोहित त्यांच्या घरात केव्हा आणि कसा घुसला? रात्री दीड वाजता विभाचे वडील बाथरूमला जाण्यासाठी उठले, तेव्हा त्यांनी पाहिले की, विभाच्या रूमचे दार उघडे होते. सकाळी त्याच खोलीतून मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर रोहित म्हणाला की, मी शुक्रवारी सकाळीच पंजाब मेलने भोपाळला आलो आहे.

 

दोन प्रयत्न अयशस्वी...
पहिल्या प्रयत्नात पोलिसांनी हायड्रोलिक मशीनच्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने 5व्या मजल्यापर्यंत पोहोचून आरोपीला बोलवण्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आणि मग खिडकीच्या ग्रिलमधून त्याचे हात पकडून ठेवण्याची योजना बनवली होती. परंतु हायटेन्शन लाइनमुळे ही योजना फेल ठरली. पोलिसांची एक टीम बाजूच्या फ्लॅटमधील दार उघडण्याची योजना तयार करत होती. रूमच्या दरवाजाला एकीकडून पोलिस कर्मचाऱ्यांनी बंद केले, तर दुसरीकडे धक्का दिला. इतर अनेक प्रकारांनी ते उघडण्यावे प्रयत्न करण्यात आले, परंतु यश आले नाही.

 

माथेफिरू म्हणाला- मला विभाचे पाय चेपावे लागताहेत...
मी रोहितशी सातत्याने बोलत होतो. तो 5-6 वेळा रूमबाहेर यायला तयार झाला, परंतु काही मिनिटांनीच परत निर्णय बदलत होता. मी म्हणालो, मला एकदा एकट्याने आत येऊ दे, परंतु ऐकले नाही. मग मी त्याला हायड्रोलिकवर चढून बोलण्यासाठी विचारले. तो तयार झाला. डोळ्याला डोळा भिडवून त्याच्याशी बोललो. समोरासमोर बोलल्याने तो थोडा शांत झाला. आधी म्हणाला की, विभाचे डोके आणि पाय दुखत आहेत. मला तिचे पाय दाबावे लागताहेत. मग म्हणाला, मला वडिलांशी बोलायचे आहे, मग आपल्या फोनवरून कॉल केला. स्पीकरवर त्याचे वडिलांशी बोलणे करण्यात आले. ते म्हणाले, बेटा आता उतरून जा, का सर्वांना त्रास देत आहेस. तेव्हा कुठे रूमबाहेर यायला तयार झाला. 
- राहुल लोढा, एसपी साऊथ

 

दरवाजा आतून तारेने बांधला
रोहित पूर्ण प्लॅनिंग करूनच तरुणीच्या घरात घुसला होता. त्याने गावठी पिस्तूलाच्या जोरावर आधी तिला रूममध्ये बंधक बनवले, मग त्याने रूममधील पूर्ण सामान फरशीवर पसरवले. त्याने दाराची आतून कडी लावून तारेने बांधून ठेवले होते. यामुळे कडी उघडूनही दार सहजरीत्या उघडता येत नव्हते. त्याने रूममध्ये फरशीवर सर्व सामान अस्ताव्यस्त केले होते.

 

विभाला केले रुग्णालयात दाखल, दोघांची होणार काउन्सेलिंग 
फ्लॅटमध्ये दोघांसाठी आधीच डॉक्टर बोलावण्यात आले होते. विभाच्या गळ्याला आणि हाताला दुखापत झाली होती. यामुळे तिला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोहित तिच्याच सोबत आहे. एसपी म्हणाले की, दोघांच्या वैद्यकीय तपासणीनंतर काउन्सेलिंग केली जाईल. दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवले जातील. यानंतर दोन्ही कुटुंबांनी रोहित आणि विभाच्या लग्नाचा निर्णय घेतला, तर पोलिस तसेच प्रशासनाच्या उपस्थितीत दोघांचे लग्न लावले जाईल.

 

15 जून रोजी रोहितने एफबीवर केली होती पोस्ट... भीड़ जिसके लिए खड़ी हो वो बनना है मुझे
15 जून रोजी रोहितने आपल्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट केली. ज्यात त्याने लिहिले की - "भीड़ में खड़ा होना मकसद नहीं मेरा, बल्कि भीड़ जिसके लिए खड़ी हो वो बनना है मुझे।" या पोस्टमध्ये तो बाइकवर दिसत आहे. या पोस्टचा अर्थ त्याने शुक्रवारी सकाळी तरुणीच्या घरात घुसून तिला बंधक बनवून हायव्होल्टेज ड्राम्यासह खरा करून दाखवला. त्याच्या फेसबुक पेजवर मुंबई बॉलीवुडचा असा कोणताही कलाकार नाही, ज्याच्यासोबत त्याने फोटो काढले नाहीत. त्याच्या या लिस्टमध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटीज आहेत. अॅक्टर जॉन अब्राहमसोबत तो आपला वाढदिवस साजरा करतानाही दिसत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या खळबळजनक प्रकरणाचे आणखी काही Photos...   

 

 

बातम्या आणखी आहेत...