आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओपिनियन पोल : मध्य प्रदेशात चौथ्यांदा येणार भाजपची सत्ता, 153 जागा जिंकणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाइम्स नाऊच्या सर्वेक्षणानुसार भाजपला काही जागांचा तोटा होऊ शकतो तर काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.-फाइल - Divya Marathi
टाइम्स नाऊच्या सर्वेक्षणानुसार भाजपला काही जागांचा तोटा होऊ शकतो तर काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.-फाइल

- सर्वेक्षणातील माहितीनुसार गेल्यावेळच्या तुलनेत भाजपला 12 जागा कमी मिळण्याचा अंदाज आहे. 

- 61% लोकांनी शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. 


भोपाळ - मध्य प्रदेशात यंदा होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप सलग चौथ्यावेळी सत्ता बनवण्यात यशस्वी होऊ शकते. एका ओपिनियन पोलमधून हा अंदाज समोर आला आहे. टाइम्स नाऊच्या या पोलनुरसार भाजप 230 विधानसभा जागांपैकी 153 जागा जिंकू शकते. मात्र गेल्या वेळच्या तुलनेत त्यांना यावेळी कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसला यावेळी 7 जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला यावेळी 7 जागांचा फायदा होऊ शकतो. त्यांना यावेळी 58 जागा मिळू शकतात. 


15 मार्च ते 20 एप्रिलदरम्यान झाले सर्वेक्षण 
टाइम्स नाऊने हे सर्वेक्षण 15 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान केले. त्यात राज्यातील सर्व 230 जागांवर 42550 मतदारांची मते लक्षात घेण्यात आली. 


मायावतींच्या पक्षालाही फायदा 
- सर्वेक्षणात भाजपला 12 जागांचे नुकसान झाल्याचे समोर येत असतानाच या सर्वेक्षणात गेल्या निवडणुकीत 4 जागा जिंकणाऱ्या मायावतींच्या बहुजन समाज पार्टी (बसपा) ला 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 
- ओपिनियन पोलनुसार 14 जागा अपक्षांच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. 


मुख्यमंत्री म्हणून शिवराज यांना पहिली पसंती 
सर्वेक्षणानुसार 61 टक्के लोकांनी शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. तर 17 टक्के लोकांनी काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य यांच्या नावाला पसंती दिली आहे. अजय सिंह यांना 6, कमलनाथ यांना 5 आणि दिग्विजय सिंह यांना 4 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. 

 

अपक्षांची शक्ती वाढणार 

निर्दलीयों की ताकत बढ़ेगी

 
पक्ष जागा 2013 संभाव्य 2018 नफा-नुकसान
भाजपा 165 153 -12
काँग्रेस 51 58 +7
बीएसपी 04 12 +8
अन्य 03 14 +11

 

 

 

बातम्या आणखी आहेत...