आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी आज करणार आदिवासी विकास पंचवार्षिक योजनांची घोषणा, 50 हजार पंचायत सदस्यांची उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जबलपूर येथून मंडला येथे जाणार आहेत. मंगळवारी दुपारी ते राष्ट्रीय पंचायतराज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. येथे मोदी व्हिडिओ कॉन्फ्रंसद्वारे देशातील 2.44 लाख पंचायतींना संबोधित करतील. याशिवाय आदिवासींना आदिवासी विकास पंचवार्षिक योजनांची भेट देतील. त्यासोबतच राज्यातील आठ मागास जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत विकास योजनावर चर्चा करणार आहेत. 

 

जबलपूरहून हेलीकॉप्टरने जातील मंडला 
- पंतप्रधान मोदी विशेष विमानाने जबलपूर येथून डुमना विमानतळावर पोहोचतील. येथून ते हेलिकॉप्टरने थेट मंडला जिल्ह्यातील रामनगर ग्राम पंचायतीकडे रवाना होणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहाणार आहेत. 

 

आदिवासींसाठी विकास योजना 
- पंतप्रधान मोदी हे मंडला येथे आदिवासी विकास पंचवार्षिक योजनांची घोषणा करतील. या योजनेंतर्गत येत्या 5 वर्षांसाठी राज्यातील आदिवासी विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या वतीने 2 लाख कोटी रुपये दिले जातील. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर राज्य सरकार या योजनांसाठीचा प्लॅन तयार करुन केंद्राला पाठवतील. 
- याशिवाय पंतप्रधान मंडला मधील मनेरी औद्योगिक क्षेत्रात 120 कोटी रुपयांच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा एलपीजी बॉटलिंग प्लांटचे भुमिपूजन करतील. 

 

सरपंचांचा सन्मान होणार 
- 2 सरपंचांचा या कार्यक्रमात सत्कार होणार आहे. मंडला जिल्ह्यातील लिंगामल ग्राम पंचायत धूर मुक्त आणि शहडोलची पखरिया ग्राम पंचायत 100%  लसीकरण झालेली आहे. 

बातम्या आणखी आहेत...