आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Will Arrive In Mandla Tribal Development Will Be Announced For Five Year Plan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राक्षसी काम केल्यास आता फासावरच लटकवू : मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंडला - राक्षसी काम करणाऱ्यांना फासावर लटकवले जाईल. कुटुंबात मुलींवर खूप लक्ष दिले जाते. परंतु मुलांकडेदेखील पाहिले पाहिजे. तसे झाल्यास अत्याचाराच्या घटना सहजपणे रोखता येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशात महिला व निष्पाप मुलींवरील अत्याचार वाढल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुन्हेगारांना हा इशारा दिला आहे.


मध्य प्रदेशातील रामनगर ग्राम पंचायत मधील पंचायत राज दिनाच्या निमित्ताने आयोजित सभेत मोदींनी मंगळवारी मार्गदर्शन केले. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशातील सुमारे २ लाख ४४ हजार पंचायतीसाठी करण्यात आले. या प्रसंगी मध्य प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय पंचायत राज व ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची उपस्थिती होती. मोदींच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री चौहान यांनी सभेला संंबोधित केले. त्यात त्यांनी केंद्र सरकारच्या बलात्काऱ्यास फाशीच्या शिक्षेबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले, चौहान निर्णयाबद्दल सांगत होते. तेव्हा टाळ्यांच्या गजरात निर्णयाचे स्वागत झाले. जनतेचे मन आेळखून दिल्लीतील सरकार निर्णय घेते, हेच यावरून सिद्ध झाले आहे, असे मोदी यांनी तो संदर्भ देत सांगितले.

 

मुलींसोबत जो कोणी राक्षसी कृत्य करेल तो फासवर लटकेल. त्यासोबत मुलांना त्यांची जबाबदारी देखील समजून सांगितली पाहिजे. मुलींच्या रक्षणाची जबाबदारी आम्हाला घ्यावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.  मंडाला जिल्ह्यातील रामनगर येथे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलींसोबत दुष्कृत्य करणाऱ्यांना आता फाशी होईल असे सांगितले. त्यासोबत मुलींच्या रक्षणाची जबाबादारी ही सामाजिक आंदोलनाप्रमाणे पुढे नेली पाहिजे असे आवाहन केले. 

 

राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त मोदींनी देशातील दोन लाख 40 हजार पंचायतींना व्हिडिओ कॉन्फ्रंसद्वारे संबोधित केले. मोदी म्हणाले, बजेटची चिंता नाही, ते कुठे खर्च करावे हा प्रश्न आहे. ते म्हणाले, 'एक काळ होता जेव्हा बजेटची चिंता होती. मात्र आज ती चिंता नाही. चिंता आहे ती ही की हे बजेट कुठे खर्च करावे. वेळेत कसे खर्च करावे. खर्च करायचे तर प्रामाणिकपणे कसे खर्च केले जातील.'

 

 

गावांमध्ये परिवर्तन करण्याचा संकल्प करावा 
- मोदी म्हणाले, आज आम्ही गावात काही चांगले काम करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. आम्ही मंडला येथे आलो तेव्हा येथील किल्ल्याची ओळख करुन देण्यात आली. येथील राजपरिवाराबद्दल सर्वांना माहित आहे. या माहितीने आमची छाती फुलून येते. आम्ही आमच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याबद्दल सांगतो. 
- 'आता लोकशाही आहे. आम्हाला एक निश्चित काळ गावाच्या विकासासाठी मिळतो. असा कोण सरपंच असेल की ज्याच्या मनात काही इच्छा नसतील. मला 5 वर्षे मिळाली आहेत. या 5 वर्षांमध्ये मी 5,10,15 अशी कामे करेल की लोक मला लक्षात ठेवतील.'

 

अत्याचाराच्या बाबतीत मोठी जबाबदारी कुटुंबाची
महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत मोठी जबाबदारी कुटुंबाची आहे. आपला मुलगा चुकीच्या मार्गाने जात आहे का, याकडे कुटुंबाने बारकाईने लक्ष दिले पाहिजे. त्यांना वेळीच रोखले पाहिजे. मुलींना रोखले जाते. मुलांना राक्षसी प्रवृत्तीकडे झुकू देऊ नका. तसे केले तरच राक्षसी प्रवृत्तीस वाढीस लागण्यापासून रोखणे शक्य होऊ शक्य होईल. मुलांनाही जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. अशा प्रकारे सामाजिक परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी व्यापक सामाजिक आंदोलन सुरू करण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

 

मोदींनी सांगितल्या तीन योजना
- मोदी म्हणाले, मी तुम्हाला तीन योजना सांगतो. त्यावर अधिक लक्ष दिले पाहिजे. एक- जनधन, दुसरी- वनधन आणि तिसरी योजना गोवर्धन. 
- जनधनच्या माध्यमातून तुम्ही तुमचे गाव आणि कुटुंबाला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणू शकता. वनधन ही अशी योजना आहे ज्याद्वारे तुम्ही वनांचा उपयोग करुन आपले उत्पन्न वाढवू शकता. तिसरी योजना आहे गोवर्धन. जर गावाने आपल्या गावातील शेणखत आणि कचरा व्यवस्थापन केले तर त्यातून विद्यूत निर्मिती होऊ शकते. दुसरा फायदा हा की आरोग्याचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. 

 

व्हिडिओ कॉन्फ्रंसद्वारे  संवाद 

राष्ट्रीय पंचायत राज दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते देशातील पंचायत समिती सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फ्रंसद्वारे  संवाद साधत आहेत. ते म्हणाले, 'आज पंचायत राज दिन आहे. महात्मा गांधींचे स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी आपल्याकडे आहे. महात्मा गांधी हे नेहमी म्हणत की खरा भारत खेड्यांमध्ये राहातो. आज पंचायत राज दिनानिमित्त देशातील दोन लाख 40 हजार पंचायती आणि तिथे राहाणाऱ्या भारतीयांना, या पंचायतींमध्ये बसलेल्या 30 लाखांपेक्षा जास्त लोकप्रतिनिधींना आणि माता-भगिनींना मी प्रणाम करतो.'

 

मोदी म्हणाले, 'तुम्ही तुमच्या गावाच्या विकासासाठी, सशक्तीकरणासाठी, गावाला समस्या मुक्त करण्यासाठी जो संकल्प कराल, जे पाऊल उचलाल त्यामध्ये भारत सरकारही सहभागी होईल.'

 

मुख्यमंत्र्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा 

- पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आठ मागास जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी नीति आयोगाने निश्चित केलेल्या मानकांनुसार या जिल्ह्यांची माहिती घेतली. 

 

सुरक्षेचा कडक बंदोबस्त 
- जबलपूरचे आयजी अनंत कुमार सिंह यांनी सांगितले की पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर डुमना एअरपोर्ट आणि आसपासच्या परिसरात सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...