आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 वर्षांची विशू म्हणाली मामाने आधी आईला ग्लास फेकून मारला, मग काठी; मी झोपले, उठल्यावर आई लटकलेली दिसली Pregnant Woman Death Of Suspicious Circumstances In Gwalior

3 वर्षांची विशू म्हणाली- मामाने आधी आईला ग्लास फेकून मारला, मग काठी; मी झोपले, उठल्यावर आई लटकलेली दिसली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - झांसी रोड परिसरातील विवेक विहारमध्ये आपल्या लहान मुलीसोबत किरायाने राहत असलेल्या प्रेग्नंट महिला सोनम (25) चा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. सोनमचा पती योगेन्द्र चंदेल गुड़गावमध्ये जॉब करतो. मृतदेह जमिनीवर होता आणि साडीचा फास मृत सोनमच्या गळ्यात अडकलेला होता. फासाचा अर्धा भाग कमऱ्यामध्ये लागलेल्या पंख्याला लटकलेला होता. जवळच भाजी कापण्याचा चाकू पडला होता. पोलिसांना महिलेच मुलगी म्हणाली की, घरी मामा आले होते, त्यांचे आईशी भांडण झाले आणि मग त्यांनी आईच्या डोक्यात काठी घातली. नंतर कळले की, महिलेच्या घरी जो तरुण आला होता, ती त्याला आपला भाऊ सांगायची. चकित करणारी बाब म्हणजे, ज्या भावाचा उल्लेख आला आहे, त्याला ना मृत सोनमचे आईवडील ओळखतात, ना नातेवाईक. त्याचे ओळखपत्र पोलिसांना आढळले आहे, त्यावर विकाससिंह जादौन असे नाव आहे.

 

लग्नाला झाली 7 वर्षे, बीएड करण्यासाठी ग्वाल्हेरात राहत होती, नेहमी घरी यायचा तरुण

यूपीच्या जालौनचे रहिवासी योगेन्द्र गुड़गावमध्ये कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करतो. त्याचे लग्न 7 वर्षांपूर्वी भिंड जिल्ह्यातील ओमकार सिंह यांची मुलगी सोनमशी झाले होते. लग्नानंतर सोनमला एक मुलगी झाली. मुलगी विशु सध्या 3 वर्षांची आहे. सोनम ग्वाल्हेरात राहून बीएडच्या अभ्यासासोबतच नोकरीही करत होती. घरमालकीन पोलिसांना म्हणाली की, नेहमी एक तरुण सोनमच्या घरी येत-जात होता. सोनम त्याला आपला भाऊ म्हणायची. परंतु त्याचे नाव कधीही सांगितले नाही. तो तरुण शनिवारी रात्रीही आला होता.

 

मामाने आधी आईला ग्लास फेकून मारला, मग काठी, मी झोपले, उठल्यावर आई फासाला लटकलेली होती
3 वर्षांची विशू पोलिसांना म्हणाली की, रात्री मामा घरी आला होता. मम्मी आणि मामाचे भांडण झाले. मामाने ग्लास फेकून मारला तेव्हा मम्मीच्या डोक्याला लागला. मग मम्मी रडू लागल्यावर मामाने काठीने मारले. मी खूप भ्यायले, मम्मीने ग्लास फेकला तो माझ्या डोक्यात लागला. मग मम्मी झोपी गेली. मामाही झोपला. रात्री मम्मीने फाशी घेतली. मामाने चाकूने साडी कापली आणि निघून गेला. मम्मीला मामाने मारले. मुलीने पोलिसांना अशी माहिती दिली.

मृत सोनमचे वडील ओमकार सिंह म्हणाले, माझी दोन्ही मुले सोबत राहतात. ते ग्वाल्हेरात आलेच नाहीत. आम्हाला माहिती नाही की, कोणता भाऊ मुलीच्या घरी आला होता. एका महिन्यापूर्वीच मुलगी माहेरातून ग्वाल्हेरात गेली होती. काही दिवसांपूर्वीच तिच्याशी फोनवर बोलणेसुद्धा झाले होते.

 

आत्महत्येचा संशय
ज्या प्रकारे मुलीने पोलिसांना घटना सांगितली आहे, त्यावरून पोलिसांनी अंदाज व्यक्त केला की, जो युवक महिलेच्या घरी आला होता, त्याच्याशी महिलेचे काही कारणावरून भांडण झाले. त्याने मारहाण केल्यानंतर महिलेने फाशी लावली. तरुणाने जेव्हा तिला फासावर लटकलेले पाहिले, तेव्हा चाकूने फास कापला असेल. महिलेचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याने तिथून पळ काढला.

 

मुलगी रडत असल्याचे ऐकून आली घरमालकीन, मृतदेह पाहून ओरडली
घरमालकीन म्हणाली, रात्री सोनमच्या रूममधून भांडणाचा आवाज येत होता. पहाटे 5 वाजता मुलगी रडत असल्याचा आवाज ऐकून तेथे गेले, तोपर्यंत मुलगी बाहेर आली होती. आत जाऊन पाहिल्यावर सोनमचा मृतदेह दिसला. ते पाहताच माझी किंकाळीच फुटली. आसपासचे लोक आले आणि मग पोलिसांना कळवण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...