आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • या IPSची फिटनेस पाहून घरातून पळून आली पंजाबी तरुणी, भेटण्याचा केला हट्ट, 4 दिवस काढले पिझ्झावर Punjabi Girl Impressed By IPS Fitness

या IPSची फिटनेस पाहून घरातून पळून आली पंजाबी तरुणी, भेटण्याचा केला हट्ट, 4 दिवस काढले पिझ्झावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - उज्जैनचे एस.पी. सचिन अतुलकर यांना भेटण्याचा हट्ट करणारी चंदिगडची तरुणी 5व्या दिवशी बुधवारी दुपारी परतली. पंजाब पोलिसांत टीआय असलेला तिचा भाऊ सकाळी उज्जैनला पोहोचला आणि समजूत घालून त्याने तिला कारमध्ये बसवून सोबत नेले. एसपीच्या फिटनेसने इम्प्रेस होऊन तरुणी घरातून पळून थेट या आयपीएसच्या उज्जैन येथील घरी पोहोचली. येथे एसपींची भेट घेण्यासाठी तिने मोठा गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना संपर्क करून तिला परत घेऊन जाण्यासाठी सांगितले होते. आई आणि इतरांनी 2 दिवस तिला परत नेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती जाण्यासाठी तयार नव्हती.

 

भाऊ आला आणि समजूत घालून घेऊन गेला
- शुक्रवारी घरातून पळून गेल्यानंतर महिला बालविकासच्या अधिकारी आणि महिला पोलिस स्टेशनच्या टीआयने तिला घरी परत जाण्यासाठी खूप समजूत घातली. परंतु तिने एसपींची भेट घेण्याचा हट्टच धरला होता. खूप समजूत घातल्यानंतरही ती ऐकली नाही. तेव्हा पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना सूचना देऊन उज्जैनला बोलावले. यानंतर तिची आई आणि काका तिला घेण्यासाठी तेथे आले. त्यांनी तिला घरी नेण्याचा प्रयत्न केला. आईने समजूत घातल्यावरही तरुणी एकच हट्ट धरून होती- "आईला सांगा, तू निघून जा. मला परत जायचे नाही."
- तरुणीचा हट्ट पाहून आईने पंजाब पोलिसांत टीआय असलेल्या मुलाला पूर्ण हकिगत सांगितली आणि उज्जैनला बोलावून घेतले. बुधवारी सकाळी भाऊ त्याच्या बहिणीला घेण्यासाठी उज्जैनला पोहोचला. येथे भावाने युक्ती वापरून बहिणीला चेकअपसाठी खाली बोलावले. खाली आधीपासूनच कारचे दार उघडून ठेवलेले होते. तरुणी खाली येताच तिला कारमध्ये बसवून कुटुंबीय पंजाबला रवाना झाले.

 

महिला बालविकास अधिकारी आणि पोलिस 5 दिवसांपासून होते संकटात
- एसपींना भेटण्याच्या जिद्दीला पेटलेल्या तरुणीला घरी पाठवण्यासाठी महिला बालविकास अधिकारी आणि पोलिस 5 दिवसांपासून त्रस्त होते. सर्व प्रयत्न करूनही ती तरुणी जाण्यासाठी तयार नव्हती. मंगळवारी अनेक तास तिची समजूत घालण्यात आली होती, उत्तर एकच होते- मी येथून जाणार नाही. आई आणि काकांनीही हार मानली होती. तरुणीचा भाऊ आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

रोज मागवावा लागत होता पिझ्झा
- पोलिस विभागात असलेला भाऊच तिचा सांभाळ करतो. वडील हयात नाहीत. कुटुंबात आई आणि भाऊच आहेत. वन स्टाप सेंटरमध्ये राहून तरुणी जेवण करत नव्हती, यामुळे रोज तिच्यासाठी पिझ्झा आणि आइस्क्रीम मागवली जात होती. रागात येऊन तिने मंगळवारी वन स्टॉप सेंटरमध्ये तोडफोडही केली होती.

 

सोशल मीडियामध्ये फोटोज पाहून झाली इम्प्रेस
- सूत्रांनुसार, पंजाबातून आलेली ही तरुणी मूळची होशियारपूरची रहिवासी आहे. 27 वर्षीय ही तरुणी 34 वर्षीय एसपी अतुलकर यांचे सोशल मीडियातील फोटोज पाहून प्रभावित झाली आणि त्यांना फॉलो करू लागली. यापूर्वीही ती एसपींना भेटण्यासाठी पोहोचली होती. अशी परिस्थिती पाहून एसपी तिला भेटले नाहीत.

 

या एसपींसोबत सेल्फी काढण्यासाठी लागते लाइन
- उज्जैनच्या या एसपींची फिटनेस पोलिस डिपार्टमेंटमध्येच नाही तर सर्वसामान्यांतही नेहमी चर्चेत असते. एसपींच्या चाहत्यांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जेव्हाही ते एखाद्या कार्यक्रमात हजेरी लावतात, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागते. तरुणीही त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी सोडत नाहीत. त्यांचे सोशल मीडियावरील अनेक फोटोज चर्चेत राहतात.

 

पहिल्या प्रयत्नात बनेल होते IPS
- सचिन अतुलकर 2007 बॅचचे पासआउट आहेत आणि फक्त 22 वर्षे वयात ते IPS बनले होते. त्यांनी ग्रॅजुएशननंतर प्रयत्न केला आणि पहिल्या वेळी यशस्वीही झाले.
- IPS सचिन यांचा जन्म भोपाळमध्ये झाला होता. त्यांचे वडील फॉरेस्ट सर्व्हिसमधून निवृत्त असून भाऊ मिलिटरीमध्ये आहे. ते 1999 मध्ये राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळलेले आहेत. त्यांनी 2010 मध्ये गोल्ड मेडलही मिळवलेले आहे. अतुलकर उज्जैनच्या आधी सागर जिल्ह्याचे एसपी होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...