आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जांभळ्या रंगाची असेल 100 ची नवी नोट, देवासमध्ये छपाई सुरू; ऑगस्टमध्ये RBI आणू शकते बाजारात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - रिझर्व्ह बँक लवकरच बाजारात 100 रुपयांची नवी नोट जारी करू शकते. ही नवी नोट जांभळ्या रंगाची असेल. या नोटेवर जागतिक वारसा स्थळांपैकी गुजरातच्या ऐतिहासिक राणीची बारव पाहायला मिळेल. आकारात ही जुन्या 100च्या नोटेपेक्षा छोटी आणि 10च्या नोटेपेक्षा किंचित मोठी असेल.

तथापि, नवी नोट जारी झाल्यानंतरही जुन्या नोटा चलनात राहतील. 100 रुपयांच्या नव्या नोटेची छपाई बँक नोट प्रेस देवासमध्ये सुरू झालेली आहे. नोटेच्या नव्या डिझाइनला अंतिम रूप म्हैसुरूच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये देण्यात आले, तेथेच 2000 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. या वेळी एक मोठा बदल म्हणजे या नव्या नोटेच्या छपाईमध्ये स्वदेशी शाई आणि कागदाचा वापर होईल.

 

नवी नोट आकारासोबतच वजनानेही हलकी असेल
म्हैसुरूमध्ये जे प्राथमिक नमुने छापण्यात आले होते, त्यात विदेशी शाईचा वापर करण्यात आला होता. देवासमध्ये स्वदेशी शाईच्या प्रयोगामुळे प्रोटोटाइपसारखे रंग जुळवताना सुरुवातीला अडचणी आल्या, परंतु नंतर त्यात यश आले. नव्या नोटेच्या आकारासोबतच वजनानेही हलकी असेल. येथे जुन्या 100 च्या नोटांच्या एका गड्डीचे वजन 108 ग्रॅम होते. दुसरीकडे साइज छोटी असल्याने 100 च्या गड्डीचे वजन 80 ग्रॅमच्या आासपास असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार देवास बँक नोट प्रेसमध्ये प्रोडक्शनही सुरू झालेले आहे. RBI ऑगस्ट वा सप्टेंबरमध्ये ही नवी नोट बाजारात आणू शकते.

 

एटीएममध्ये करावा लागेल बदल:
बँकांना आपल्या एटीएममध्ये पुन्हा एकदा बदल करावे लागतील. यानंतरच 100 च्या नव्या नोटा ठेवता येतील. 2014 मध्ये केंद्रात नवे सरकार आल्यानंतर चौथ्यांदा बँकांना त्यांच्या एटीएममध्ये बदल करावा लागणार आहे.

 

नवे सुरक्षा फीचर:
नव्या नोटेत सामान्य सुरक्षा फीचरसोबतच जवळजवळ एक डझन नवीन सूक्ष्म फीचरही असतील, ते फक्त अल्ट्रावायलेट प्रकाशात पाहिले जाऊ शकतील.

 

युनेस्कोच्या यादीत आहे राणीची बारव:
गुजरातच्या पाटण येथील राणीची बारव युनेस्कोने 2014 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील केली. ही बारव सन 1063 मध्ये गुजरातचे शासक भीमदेव सोलंकी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पत्नी राणी उदयमति यांनी बांधली होती. मागच्या शतकात पुरातत्व विभागाने ही शोधली. तत्पूर्वी ही बारव जवळजवळ 700 वर्षे सरस्वती नदीच्या गाळात दबून होती. युनेस्कोने या बारवेला भारताच्या सर्व बारवांची राणी असा किताबही दिला आहे.

 

सांचीचा स्तूपही छापलेला आहे नोटेवर
यापूर्वी 200 च्या नोटेवर म. प्र.ची सांची स्तूप, 500 च्या नोटेवर दिल्लीचा लाल किल्ला, 50 च्या नव्या नोटेवर कर्नाटकातील हंपी आणि 10 रुपयांच्या नोटेवर कोणार्कचे सूर्य मंदिर छापण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...