आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Postmortem साठी आलेच नाही डॉक्टर, सासू-जावयाचा मृतदेह एकमेकांवर लादून गेले नातेवाइक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यात मधूसुदनगड परिसरात एका जावई आणि सासूचे अपघाती निधन झाले. त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा आरोग्य केंद्रात आणले. परंतु, कित्येक तास वाट पाहिल्यानंतरही त्या रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टर आलेच नाही. अतिशय विक्षिप्त झालेल्या मृतदेहांना घेऊन बराच वेळ नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर बसावे लागले. अखेर वाट पाहण्याची मर्यादा संपल्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले. तेव्हा सुद्धा त्यांची मदत करण्यासाठी कुणीच आले नाही. आपल्या हातांनी त्यांनी सासू आणि जावयाचा मृतदेह एकमेकांवर लादला आणि राघौगडच्या दिशेने निघाले.


ट्रकच्या धडकेत जागीच ठार...
मधूसुदनगड पोलिस स्टेशन हद्दीत सोमवारी दुपारी 3 वाजता भोपाळला जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने एका बाइकला धडक दिली. या बाइकवर विदिशा जिल्ह्यातील रहिवासी शिंभू आपल्या सासूसोबत जात होते. हा ट्रक त्या दोघांच्याही डोक्यावरून गेले. या भीषण अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा आरोग्य केंद्रात रवाना केला. याच ठिकाणी नातेवाइक मृतदेह घेऊन डॉक्टरांची वाट पाहत होते. अखेर संध्याकाळ झाली. त्यांना रुग्णालयाने एका रुग्णावाहिकेची व्यवस्था सुद्धा करून दिली नाही. रुग्णालयातून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी एक इंडिका कार भाड्याने घेतली. त्यामध्ये दोन्ही मृतदेह ठेवणे शक्य नव्हते. अशात त्यांना मृतदेह एकावर एक ठेवावा लागला. 


डॉक्टरांनी दिले असे स्पष्टीकरण...
मधूसुदनगड येथे प्रभारी पदावर असलेले डॉक्टर मुकेश शर्मा राघवगडच्या बीएमओचे अतिरिक्त पद सांभाळत आहेत. त्यामुळे, दोन्ही ठिकाणी सामंजस्य ठेवणे कठिण होत असल्याचे ते सांगतात. मुकेश शर्मा सोमवारी राघौगड येथे कार्यरत होते. त्यामुळे, मधूसुदनगड येथे पोस्टमॉर्टम शक्य नव्हते. यानंतर आपणच पीडितांच्या नातेवाइकांना राघौगडला बोलावलो आणि रात्री 8 वाजता शवविच्छेदन करण्यात आले असे स्पष्टीकरण डॉ. मुकेश शर्मा यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...