आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियन तरुणीची इंटरनेटवर झाली इंडियन मुलाशी मैत्री, 7 वर्षांच्या प्रेमानंतर मंदिरात केले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खजुराहो (मध्य प्रदेश) - ऑनलाइन चॅटिंगच्या माध्यमातून पहिल्यांदा मैत्री झाली, मग प्रेम झाले, हे प्रेम बहरले आणि दोन भिन्न देशांचे, संस्कृतींचे आणि भाषांचे हे प्रेमीयुगुल प्रेमाखातर नेहमीसाठी एक झाले. खजुराहो येथील तरुणाचे रशियन तरुणीवर प्रेम जडले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. नवरात्रीच्या निमित्ताने दोघांनी हिंदू रीतिरिवाजाने मंदिरात विवाह केला.

 

अशी आहे या कपलची लव्ह स्टोरी
- खजुराहोचा रहिवासी अंजुल सिंह राजावत रशियाच्या मॉस्कोमध्ये राहून हॉटेल व्यवसाय करतो. त्याची 7 वर्षांपूर्वी ऑनलाइन साइट्सच्या माध्यमातून तेथील श्वेतालाना नावाच्या तरुणीशी लग्न झाले. ही मैत्री हळूहळू दाट होत गेली आणि प्रेमात बदलली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

- आजपासून 4 वर्षांपूर्वी रशियातच दोघांनी कोर्टात लग्न केले होते. लग्नानंतर दोघेही तेथे एकत्र राहू लागले. काही दिवसांपूर्वी अंजुल हा श्वेतालाना आणि तिच्या नातेवाइकांना घेऊन खजुराहोमध्ये आला. येथील संस्कृतीमुळे प्रभावित झालेल्या श्वेतालानाने हिंदू रीतिरिवाजाने पुन्हा लग्न करण्याची त्याच्यासमोर इच्छा व्यक्त केली.

- अंजुल म्हणाला की, श्वेतालानाचा प्रस्ताव स्वीकारत बुधवारचा मुहूर्त काढला आणि खजुराहोच्या बघराजन मंदिरात हिंदू रीतिरिवाजाने लग्न केले.

 

नवरीच्या भावाने आणि बहिणीने पूर्ण केले विधी
- विद्वान आचार्यांच्या मंत्रोच्चाराद्वारे अग्नीचे 7 फेरे घेतले. हिंदू रीतिरिवाज सर्व विधी पार पडले. वर- वधूने मंत्रोच्चारासह एकमेकांना वरमाळा घातल्या.
- या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे वधू श्वेतालानाचे भाऊ-बहीण व नातेवाईकही रशियातून या कार्यक्रमात सामील झाले. या लग्न समारोहात वधू श्वेतालानाच्या कुटुंबीयांशिवाय अंजुल सिंहचे कुटुंबीय, नातेवाईकही सामील झाले. अंजुल आणि श्वेतालाना यांचे हे लग्न 3 दिवसांपर्यंत खजुराहोमध्ये चर्चेचा विषय ठरले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या लग्नाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...