आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: भय्यू महाराजांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले हजारो लोक, मुलीने दिला मुखाग्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अध्यात्मिक संत आणि सामाजिक कार्यकर्ते भय्यू महाराज अनंतात विलीन झाले आहेत. बुधवारी दुपारी 3.48 वाजता मुलगी कुहूने पित्याला मुखाग्नी दिला. यावेळी वातावरण शोकाकूल झाले होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत स्नेहपूर्ण संबंध असलेल्या भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारी सकाळपासून रिघ लागली होती. भय्यू महाराज यांनी मंगळवारी दुपारी इंदूर येथील राहात्या घरी मुलगी कुहूच्या रुममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. 13 महिन्यांपूर्वी 30 एप्रिल 2017 रोजी त्यांनी दुसरे लग्न केले होते. भय्यूजी यांच्याकडे पॉकेट डायरीत दीड पानाची सुसाइड नोट सापडली होती. त्यात त्यांनी 'मी खूप तणावात आहे. थकलोय, त्यामुळे सोडून जातोय... ' असे लिहिले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सर्वोदय आश्रम ते भमोरी येथील मुक्तिधामपर्यंतचा भय्यू महाराजांचा अखेरचा प्रवास... 

 

 

बातम्या आणखी आहेत...