आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ - मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील सोन नदीच्या जोगदहा पुलावरून लग्नाचा ट्रक अनियंत्रित झाल्याने 100 फूट खोल नदीत कोसळला. या भीषण अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून, 25 जण जखमी झाल्याचे समजते. पोलिसांच्या मते, यात बहुतांश जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृत्यूचा आकडा वाढू शकतो. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या अपघाताविषयी दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करत आहे.
कुठे आणि कसा झाला अपघात?
- अमिलिया पोलिस स्टेशनचे प्रमुख दीपक बघेल यांच्या मते, रात्री 9.30 वाजता देवसरच्या हर्राबिजी गावातील मुजब्बील खान यांचे वऱ्हाड सिहावलच्या पमरिया गावाकडे जात होते. यादरम्यान हनुमान रोडवर सोन नदीच्या हनुमान पुलावर ट्रक अनियंत्रित होऊन नदीत कोसळला.
- पोलिस अधीक्षक मनोज श्रीवास्तव म्हणाले की, अंधार असल्याने बचावक कार्यात अडथळे आले. तथापि, ट्रकमध्ये फसलेल्या सर्व मृतदेहांना आणि जखमींना बाहेर काढण्यात आले.
- जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक गॅस कटरने कापून बाहेर काढले मृतदेह
- पोलिसांनी सांगितल्यानुसार, अपघातग्रस्त बहुतांश जण ट्रकखाली अडकलेले होते. यामुळे ट्रक गॅस कटरने कापून मृतांना व जखमींना बाहेर काढावे लागले.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.