आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP चे सीएम शिवराजसिंहाना आला राग, रोड शोदरम्यान सुरक्षा रक्षकाला हात धरून ढकलेल मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना प्रथमच नागरिकांनी रागाने लालबूंद झालेले पाहिले. महानगर पालिका निवडणूक प्रचारानिमित्त मुख्यमंत्री चव्हान रविवारी सरदारपूर येथील भाजप उमेदावराच्या प्रचारासाठी आले होते. शहराच्या मुख्य भागातून त्यांनी पदयात्रा सुरु केली. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती, तेव्हा कोट घातलेली एक व्यक्ती वारंवार त्यांना धक्के देत चालली होती. यामुळे मुख्यमंत्री चव्हान चिडले आणि त्यांनी त्याचा हात पकडला आणि त्याला मागे ढकलेल. मुख्यमंत्री शिवराजसिंह हे शांत स्वभावासाठी ओळखले जातात, मात्र भर रस्त्यावर पदयात्रे दरम्यान अचानक ते रागाने लाल झालेले पाहून समर्थक कार्यकर्त्यांसह सर्वांनाच आश्चर्य वाटले. कोट घातलेली व्यक्ती ही त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेला गार्ड होता. 

 

 मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे, की रविवारी दुपारी मुख्यमंत्री राजगड येथे रोड शो करत होते. भाजप उमेदवार रोमा धर्मेंद्र मंडलोईच्या प्रचारासाठी शिवराजसिंह यांची पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. 
- सरदारपूर बस स्टँड येथे पदयात्रा पोहोचल्यानंतर शिवराजसिंहांनी जनतेला संबोधित केले. निवडणूक संकल्प पत्र हातात घेऊन शिवराजसिंह म्हणाले, यामध्ये ज्या-ज्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत त्या सर्व आम्ही पूर्ण करु. 
- यानंतर सीएमने पुन्हा पदयात्रा सुरु केली. तेव्हा त्यांचा गार्डचा त्यांना धक्का लागला. असे एकदा नाही तर वारंवार झाल्याने शिवराजसिंह संतप्त झाले आणि त्यांनी गार्डचा हात पकडून त्याला मागे ढकलले. 

 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुख्यमंत्र्यांनी गार्डला कसे ढकलले... 

बातम्या आणखी आहेत...