आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Is The Youth Who Hostages A Girl From 11 Hours See His Pics With Film Celebrity

हाच आहे तो माथेफिरू, 12 तास कैदेत ठेवले होते तरुणीला, पाहा सेलिब्रिटींसोबतचे Photos..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माथेफिरू रोहित सिंहचा अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबतचा फोटो. - Divya Marathi
माथेफिरू रोहित सिंहचा अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबतचा फोटो.

भोपाळ - मिसरोद परिसरात एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने जवळजवळ 12 तासांपासून मॉडेलला फ्लॅटमध्ये कैद करून ठेवले होते. 12 तास चालेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी मॉडेल तरुणीला संध्याकाळी 7.30 वाजता सुरक्षितरीत्या बाहेर काढले.

पीडितेच्या हाताला व गळ्यावर जखम आहे. तिला व माथेफिरू तरुणाला ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले.

 

पोलिसांनी 12 तास काढली माथेफिरूची समजूत

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला विश्वास दिला होता की, तुम्ही दोघेही सज्ञान आहात दोघेही सहमतीने लग्न करू शकतात. दरम्यान, आरोपी मात्र पोलिसांना स्वत:वर गोळी झाडण्याची धमकी देत होता. भोपाळचे एसपी राहुल लोढा यांनी माथेफिरू तरुणाची समजूत घातल्यानंतर तो बाहेर येण्यासाठी तयार झाला.

 

माथेफिरूने पोलिसांपुढे ठेवल्या मागण्या...

दरम्यान, रोहितने पोलिसांपुढे काही मागण्या ठेवल्या होत्या. त्यानुसार त्याचे मोबाइल रिचार्ज करावे, त्याला नवीन टी-शर्टही द्यावे अशा त्या मागण्या होत्या. बाहेर आल्यावर त्या दोघांचे लग्न लावून देण्याबाबतही त्याने पोलिसांनी सांगितले. त्याच्या सर्व मागण्या पोलिसांनी मान्य केल्या. घटनास्थळी स्वत: एसपी त्याच्याशी संवाद साधत होते. मागण्या मान्य करूनही बराच वेळ रोहित बाहेर आला नव्हता. परंतु शेवटी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले.

 

समजूत घालण्यासाठी लागले 12 तास- एसपी

याप्रकरणी एसपी म्हणाले, 12 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. सतत 12 तास तरुणाचे काउन्सेलिंग करण्यात आले. त्याची समजूत घालण्यात आली. त्याच्याशी बोलण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने खिडकीच्या ग्रिलजवळ जाऊनही संवाद साधण्यात आला. त्याच्या मनातील सर्व भीती काढून टाकण्यात आली. त्याच्या मनात विश्वास तयार झाल्यावर कुठे तो बाहेर येण्यासाठी तयार झाला.

 

काय होते प्रकरण...

मिसरोद परिसरात एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने जवळजवळ 10 तासांपासून मॉडेलला फ्लॅटमध्ये कैद करून ठेवले आहे. पीडित तरुणीचा हा फ्लॅट 5व्या मजल्यावर आहे.  

पोलिस म्हणाले की,  प्रकरण एकतर्फी प्रेमाचे आहे. तरुणाचे नाव रोहित सिंह असून तो मूळ अलिगडचा रहिवासी आहे. तो मुंबईत मॉडेलिंग करत होता आणि तेथेच त्याची तरुणीशी भेट झाली. तो खूप दिवसांपासून लग्नासाठी तरुणीवर दबाव टाकत होता. दरम्यान, त्याचे मॉडेलिंग करतानाचे अनेक सेलिब्रिटींसोबतचे फोटोज समोर आले आहेत.

 

"कुणीही रूमजवळ आले, तर तिला मारून टाकीन..."

पोलिस म्हणाले, तरुण धमकी देतोय की, कुणीही रूमजवळ आले तर तो तरुणीवर गोळी झाडेन. त्याने स्वत:लाही दुखापत करून रक्तबंबाळ केले. माथेफिरू म्हणतोय की, वडील आल्यावर दार उघडेन. कैदेतील तरुणी ही बीएसएनएलच्या माजी एजीएमची कन्या आहे.

 

 

एसपी राहुल लोढ़ा म्हणाले की, पोलिसांनी रूममध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने एका एसआयवर कात्रीने हल्ला चढवला. त्याच्याजवळ कट्टा आणि चाकूही आहे. काही वेळापूर्वी त्याने पाणी आणि कॉटन मागितले, ते त्याला बादलीमध्ये टाकून देण्यात आले. यानंतर त्याने व्हिक्ट्री साइन आणि मनगट दाखवले. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आरोपीचे अनेक सेलिब्रिटींसोबत फोटोज...   

 

 

बातम्या आणखी आहेत...