आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Minor बहिणींवर अत्याचार: एकीने बाळाला दिला जन्म, दुसरी गर्भवती; बाप म्हणाला, फाशी द्या नराधमांना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीहोर (मध्य प्रदेश) - येथे दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलींना आई नाही. त्या आपल्या वडिलांसोबत राहतात. यापैकी एका बहिणीने शुक्रवारी आपल्या घरातच बाळाला जन्म दिला. शेजारच्या लोकांना या घटनेची माहिती शनिवारी सकाळी मिळाली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर लोकांनी त्या अल्पवयीन मुलीला तिच्या बाळासह रुग्णालयात दाखल केले. दिवसभर झालेल्या चौकशीनंतर शेजाऱ्यांना दुसरा धक्का बसला. दुसरी अल्पवयीन बहिण सुद्धा गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर घटनास्थळी पोलिसांना बोलावण्यात आले. त्यांनी एफआयआर दाखल करून एकाला अटक केली आहे. पीडित मुलींच्या वडिलांनी या कृत्यासाठी जबाबदार असलेल्या सैतानांना फाशी देण्याची मागणी केली आहे. 


परिचयातील युवकांनीच केले दोघींवर अत्याचार
बाळाला जन्म देणाऱ्या 15 वर्षीय पीडितेने सांगितल्याप्रमाणे, सप्टेंबर 2017 मध्ये तिची ओळख हनीफ उर्फ अन्नूशी झाली होती. मैत्रीत गैरफायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर ती गर्भवती झाली होती. तर दुसऱ्या पीडितेने सांगितल्याप्रमाणे, ऑक्टोबर 2017 मध्ये कमलेश गोस्वामीने तिला धमकावून बलात्कार केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या अत्याचारावरून ती देखील गर्भवती झाली आहे. एक आरोपी एप्रिलपासून बेपत्ता आहे. तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. 


घरात न सांगताच केला विवाह
गर्भवती असलेल्या पीडितेने सांगितल्याप्रमाणे, तिने घरात काहीही न सांगता कमलेशसोबत विवाह केला होता. तो गेल्या 2 वर्षांपासून तिच्या संपर्कात होता. परंतु, तीन महिन्यांपूर्वीच तो अचानक गायब झाला. पोलिस या प्रकरणाचा बारकाईने प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. एसपी राजेश सिंह चंदेल यांनी सांगितल्याप्रमाणे, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. पीडितांना न्याय आवश्य मिळवून दिला जाईल. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्याचा कसून शोध घेतला जात आहे. त्याला देखील लवकरच अटक केली जाईल. 

बातम्या आणखी आहेत...