आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लग्नाला हो म्हणाले नसते तर त्याने खून केला असता,' पीडितेची आपबीती- माथेफिरूच्या कैदेत असे होते 12 तास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभा म्हणाली, "त्याला फाशीच मिळाली पाहिजे. कारण तो जर जिवंत राहिला, जेलमध्ये राहून सुटला किंवा जेल तोडून पळाला तर पुन्हा माझ्या मागे लागेल. माझी हत्या करेल."

 

भोपाळ - फॉर्च्युन डिव्हाइन सिटीमध्ये माथेफिरू रोहित सिंहच्या या कृत्यामुळे देशभरात खळबळ उडाली. कॉलनी दिवसभर लोकांनी भलीमोठी गर्दी जमली होती. पोलिस दिवसभर माथेफिरूची समजूत काढत होते, कारण त्याच्या ताब्यात विभा कैदेत होती, तिचे आयुष्य पणाला लागले होते. यादरम्यान, विभाच्या आईने पोलिसांवर कडक कारवाई न केल्याचा आरोप केला, तेव्हा पोलिसांनी तो फेटाळून लावला. रात्री उशिरा तेच झाले, जे काम पोलिसांनी कायद्यानुसार करायला पाहिजे होते. रोहितविरुद्ध गंभीर कलमांमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. आता शनिवारी त्याची धिंडही काढली जाणार आहे.

 

पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल..
पोलिसांना दिलेल्या जबाबात तरुणी म्हणाली की, "रोहितला जेल झाली पाहिजे, नाहीतर तो मला जिवंत ठेवणार नाही. या आधारे रोहितविरुद्ध जीवघेणा हल्ला करणे, बंधक बनवणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआयनेही रोहितविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे."

 

पीडितेची आपबीती तिच्याच शब्दांत...
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पीडिता विभा म्हणाली, "मागच्या 3-4 महिन्यांपासून रोहित मला त्रास देत होता. फेब्रुवारीमध्येही एकदा त्याने अशाच प्रकारे घरी येऊन मला बंदुकीच्या धाकावर धमकी दिली होती. मारहाणही केली होती. तेव्हा मी कशीबशी वाचले, आता या वेळीही सुदैवाने वाचले आहे."

 

"रोहितने मला बेदम मारहाण केली, त्याने कात्रीने हल्ला केला. मी भीतीने त्याला लग्नाला हो म्हणाले तेव्हा कुठे तो थोडा शांत झाला. त्याक्षणी मला कसेही करून माझा जीव वाचवायचा होता."

 

"रोहित माझा खून करायलाच आला होता. त्याचे म्हणणे होते की, मी जर त्याची झाले नाही, तर या जगात राहू शकत नाही. त्याला त्याच्या जिवाचीही पर्वा नाही. मी जर त्याला लग्नाचे वचन दिले नसते, तर त्याने माझी हत्या केलीच असती."

 

"तो घरात कसा आला ते माहिती नाही. मी दार उघडले नव्हते. तो घरात आला त्या वेळी वडील बाहेर गेलेले होते. दार बाहेरून बंद होते. मग तो घरात आल्यावरही बाहेरून दार कसे बंद झाले, हे समजले नाही."

 

"रोहितकडून अजूनही माझ्या जिवाला धोका आहे. जोपर्यंत तो जिवंत असेल तोपर्यंत तो माझा असाच पाठलाग करत राहील. त्याने लास्ट टाइमही मला धमकी दिली होती की, माझे जे व्हायचे ते होईल, तुला माहितीये याचे परिणाम काय होतील, तुझ्या कुटुंबाचे काय होईल?"

 

"त्याची नक्कीच काहीतरी मानसिक प्रॉब्लेम असावा. कारण आजच्या काळात कोणी असे एखाद्याच्या मागे लागत नाही."

 

"त्याला फाशीच मिळाली पाहिजे. कारण तो जर जिवंत राहिला, जेलमध्ये राहून सुटला किंवा जेल तोडून पळाला तर पुन्हा माझ्या मागे लागेल. माझी हत्या करेल. म्हणूनच त्याला फाशीच झाली पाहिजे."

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या खळबळजनक घटनेचे आणखी Photos... व Video 

 

 

बातम्या आणखी आहेत...