आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सी ग्रेड चित्रपटांत झळकली आहे भोपाळमधील पिडिता, आरोपी म्हणाला-लग्न करेन तर तिच्याशीच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - येथील डिव्हाइन सिटीमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने बंदी बनवलेल्या पीडित मॉडेल तरुणीबाबत नवा खुलासा झाला आहे. ही तरुणी म्हणजे विभा श्रीवास्तव हिने मॉडेलिंगबरोबरच अनेक सी ग्रेड चित्रपटांत काम केल्याचेही समोर आले आहे. तरुणीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर आहेत. तसेच चित्रपटाच्या कास्टींगमध्येही तिचे नाव आहे. 


रोहितने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, विभाने स्वतः घरातील सगळे झोपल्यानंतर रात्री 12 वाजता त्याला घरात घेतले होते. त्याला जे केले त्याचा पश्चात्ताप नसल्याचेही रोहित म्हणाला. त्या मुलीवर प्रेम करतो आणि तिच्याशीच लग्न करणार याचा पाढा त्याने लावला आहे. 


पोलिसांकडेही करतोय डिमांड 
आरोपी पोलिस कस्टडीतही त्याच्या मर्जीनुसार विविध डिमांड करतोय. सकाळी त्याने सील पॅक पाण्याची बाटली तसेच नाश्त्यासाठी हलक्या आहाराची मागणी केली. त्याला पोहे आणि चहा देण्यात आले. तरुणीची प्रकृती स्थिर असून तिला अद्याप रुग्णालयातून सुटी मिळालेली नाही. 


कुटुंबीयदेखिल आरोपीमुळे त्रस्त 
मॉडेल तरुणीला बंधक बनवणाऱ्या रोहितमुळे त्याचे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. मे महिन्यात बहिणीच्या लग्नासाठी घरी आला तेव्हा त्याने पैशाची मागणी करत मारहाणही केली होती, असे समोर येतेय. याच रागातून त्याचे वडील रेशमपाल यांनी त्याला वारसाहक्कापासून बेदखल केले. त्याची कायदेशीर प्रक्रियाही त्यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...