आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पत्नीनेच दिली होती डॉक्टर पतीचे गुप्तांग कापण्याची सुपारी Wife Accused For Husbands Murder In MP

पत्नीनेच दिली होती डॉक्टर पतीचे गुप्तांग कापण्याची सुपारी, म्हणाली- त्या लिंगपिसाटाला धडा शिकवायचा होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर (मप्र) - शहरात 12 जून रोजी झालेल्या डॉ. शफतुल्ला खान मर्डर प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपी पत्नीच निघाली आहे. एसपी शशिकांत शुक्ला म्हणाले, पत्नी आयशानेच 4 जणांसोबत मिळून डॉक्टर पतीच्या हत्येचा कट रचला होता. तिने आपला गुन्हाही कबूल केला आहे. मृत राज्य आरोग्य विभागात डेप्युटी डायरेक्टर होते. याप्रकरणी आरोपी पत्नी, पुतणी तसेच आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. तथापि, पत्नीने स्वत:चा बचाव करताना अनेक दावे केले आहेत.  

 

धडा शिकवायचा होता लिंगपिसाट पतीला...

- आरोपी आयशा म्हणाली, तिचा पती खूप रंगेल होता. त्याचे अनेक महिलांशी अवैध संबंध होते. याची माहिती मिळाल्यावर तिला त्याची हत्या न करता फक्त प्रायव्हेट पार्ट कापायचा होता.
- आयशाने मृत पतीवर आरोप केला की, डॉ. शफतुल्लाने तिच्या पुतणीचे आयुष्यही बरबाद केले आहे. ती फक्त 9 वर्षांची होती तेव्हा त्याने अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केले.
- महिला असेही म्हणाली की, डॉ. पतीची सख्ख्या मुलीवरही वाईट नजर होती. त्याने तिच्यावरही हात टाकला असता, म्हणूनच त्याचा काटा काढणे गरजेचे होऊन बसले होते. 
- 'रामाने जसा रावणाचा वध केला होता, तसाच मीही त्याचा केला आहे. मला बिलकूल पश्चात्ताप नाही. त्या नराधमाला धडा शिकवणे गरजेचे होते.'

 

सुपारी देताना ठेवली होती ही अट
- डॉ. पतीच्या हत्या घडवण्यासाठी आयशाने पुतणी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने गुजरातच्या दोन कुख्यात गुंडांना 50-50 हजार रुपयांची सुपारी दिली होती.
- पोलिस म्हणाले, आयशाने सुपारी देताना गुंडांसमोर अट ठेवली होती की, हत्या केल्यानंतर त्यांनी त्याचा प्रायव्हेट पार्टही कापावा, तेव्हाच तिला समाधान मिळेल.
- परंतु भीतीमुळे हत्या करणाऱ्या गुंडांनी असे केले नाही. गुंडांनी हाताची नस कापली आणि पोटात चाकू भोसकून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता.

 

एका इशाऱ्याची पाहत होते वाट
- सूत्रांनुसार, हत्येआधी दोघेही आयशाचा इशारा येण्याची वाट पाहत होते. दोघेही पवन अपार्टमेंटच्या खाली जवळपास 5.30 वाजता येऊन उभे राहिले होते.
- यानंतर संध्याकाळी 7 वाजता सिग्नल मिळताच घरात शिरले. मग घरच्यांना धमकावले आणि डॉक्टरची हत्या करून पळून गेले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos..  

 

बातम्या आणखी आहेत...