आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: विवाहितेची अब्रू लुटल्यावर पोलिसांनी घेतली नव्हती तक्रार, मग तिने आरोपीला बहाण्याने बोलवून केले शिर धडावेगळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुना (एमपी) - 06 जुलै रोजी जंगलात आढळलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाप्रकरणी पोलिसांनी एका पती-पत्नीला अटक केली आहे. शिवपुरीमध्ये गुना (105 Km) येथे यऊन या दोघांनी हे कृत्य केले. शिर शेतातच एका ठिकाणी पुरले होते, परंतु ते जंगली जनावरांनी काढून नेले. आरोपी पती म्हणाला, मृत व्यक्ती त्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवायचा, त्याने एकदा तिच्यावर बलात्कारही केलेला आहे. तेव्हा पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती. म्हणून आम्ही दोघांनी मिळून त्याचा काटा काढला. दुसरीकडे आरोपी महिला म्हणाली- त्या राक्षसाला मारून मी आज खूप खुश आहे.

 

असा लावला पोलिसांनी छडा...

- गुनाच्या सिरसी परिसरात 6 जुलै रोजी मुंडके नसलेला मृतदेह पोलिसांना आढळला होता. त्याची ओळख पटवण्यासाठी कोणताही पुरावा नव्हता.

- एसपी निमिष अग्रवाल यांनी याच्या तपासाची जबाबदारी एसडीओपी राजेंद्र सिंह, थाना प्रभारी रुपाली परिहार, सायबर सेल प्रभारी मसी खान यांच्यासह टीमला सोपवली होती. मृतदेहाजवळ आढळलेल्या बॅगमध्ये पोलिसांना कुशवाह समाजाच्या सामूहिक विवाह समारोहाचे 2 वर्षे जुने पॉम्प्लेट मिळाले होते. यात शिवपुरी समाजाचे अध्यक्ष हरिसिंह कुशवाह यांचा मोबाइल नंबर होता, हाच सुगावा मृताची ओळख पटवण्यासाठी पुरेसा ठरला. मृताची ओळख शिवपुरीचा रहिवासी करणसिंह अशी पटली.

 

मृत होता भाजप कार्यकर्ता...

- मृताची पत्नी करेरा मंडईतील डायरेक्टर तसेच भाजप नेत्या आहेत. मृत करणसुद्धा भाजप कार्यकर्ता होता. यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने शोध घेतला की, मृताची कोणाशी बातचीत झाली होती. या संशयाच्या आधारे पोलिसांनी भगवान दास कुशवाह आणि त्याची पत्नी हल्की बाई यांना अटक केली. दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

 

देवीच्या दर्शनाला जाण्याचा केला बहाणा...
आरोपींनी करण सिंहच्या हत्येसाठी सुनियोजित कट रचला होता. करण सिंह हल्कीबाईवर वाईट नजर ठेवायचा. तो तिला म्हणाला की, आपण गुना येथील निहालदेवी मंदिरात दर्शनाला जाऊ, यावर हल्की बाईने होकार भरला. परंतु ही बाब तिने आपल्या पतीला सांगितली. 5 जुलै रोजी महिला आणि तिचा पती तसेच करण बसने सिरसीपर्यंत पोहोचले. मग पायीच मंदिरासाठी निघाले, तेवढ्यात आरोपींनी कुऱ्हाडीने हल्ला चढवला आणि त्याचे मुंडके धडावेगळे करून शेतात गाडून टाकले. 

 

मी मजबूर झाले होते, पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती, कारण तो नेता होता...

महिलेने सांगितले, मला त्याची हत्या केल्याचा कोणताही पश्चात्ताप नाहीये. कारण करण सिंहने 3 वर्षांपूर्वी माझी अब्रू लुटली होती. शिवपुरी जिल्ह्यातील अमोला पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती. उलट आम्हालाच धमकावले होते की, नेत्यावर खोटे आरोप लावत आहात. करणचे चाळे दिवसेंदिवस त्रासदायक ठरू लागले होते, तो नेहमी मला मिळवण्यासाठी खटापट्या करत होता. म्हणून मी पतीसोबत मिळून त्याचा मर्डर केला. त्या राक्षसाला ठार केल्याचा मला आज खूप आनंद झाला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...