आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Suicide ड्रग्सचे व्यसन लावले, नंतर पैशासाठी दबाव आणायची IAS ची मुलगी, मुलाने स्वतःला संपवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी श्रुति शर्मा आणि शालीन उपाध्याय. - फाइल - Divya Marathi
आरोपी श्रुति शर्मा आणि शालीन उपाध्याय. - फाइल

बैतूल(मध्यप्रदेश) - भोपाळच्या एलएन मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या MBBS च्या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी हायप्रोफाइल आहेत. 4 विद्यार्थ्यांशिवाय मुख्य आरोपी श्रुती शर्मा विधानसभेचे माजी मुख्य सचिन सत्यनारायण शर्मा यांची मुलगी आहे. पोलिसांनी सांगितले की, श्रुती ड्रग्ससाठी तरुणांशी मैत्री करून त्यांच्यावर घरून पैसे मागवण्यासाठी दबाव आणायची. पैसे मागवले नाही तर ती त्यांना मारहाण करायची. 


पाचही आरोपींवर ब्लॅकमेलिंगचा आरोप 
भोपाळच्या एलएन मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस सेकंड ईअरचा विद्यार्थी यश पाठेने 16 जूनला फाशी घेत आत्महत्या केली होती. त्याच्या नातेवाईकांनी श्रुती शर्मा आणि 4 मुलांवर रॅगिंग आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप लावला. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॉलेज व्यवस्थापन आणि मुलांचे जबाब नोंदवले. त्यानंतर श्रुती आणि तिचे सहकारी शालीन उपाध्याय, गौरव दुबे, आकाश सोनी, कार्तिक खरे यांच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


मुलांना ड्रग्ज पुरवायची श्रुती 
पोलिसांनी सांगितले की, श्रुतीची मोठी बहीण शेफाली शर्मा एलएन मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करतेय. शेफालीने यश आणि श्रुतीची भेट घालून दिली होती. श्रुतीचे सहकारी शालीन उपाध्याय, गौरव दुबे, आकाश सोनी, कार्तिक खरे यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रुतीला ड्रग्जचे व्यसन होते, हेही समोर येत आहे. श्रुती मुलांना ड्रग्ज पुरवायची अशी माहितीही आता समोर येत आहे. 


2 आरोपींना बैतूलला आणले 
पोलिसांनी सांगितले की, यशने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात श्रुती शर्मा आणि 4 मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला लवकरच अटकही होणार आहे. पोलिसांनी दोन आरोपींना बैतुलला आणले असून त्याची चौकशी सुरू आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...