आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DPS बस अपघात : फुटेजमध्ये हसताना दिसले चिमुकले, स्फोट होताच झाले होत्याचे नव्हते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - येथील दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) बस अपघातात लसुडिया पोलिसांना बसमधून जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सापडले आहे. त्यात बस स्टार्ट झाल्यापासून ती डिव्हायडरला धडकेपर्यंतच्या घटना कैद आहेत. शाळेपासून बस निघण्यापूर्वी आतमध्ये बसलेली मुले हसत खेळत घरी जाण्यासाठी बसमध्ये चढत असल्याचे यात दिसते. एक मुलगी टिफीनमधून काहीतरी खात असल्याचेही दिसले. तिच्याजवळ बसलेली मुलगी बाहेर पाहत होती. अपघातात प्राण गमावलेल्या हरमित कौर आणि कृती अग्रवाल बसच्या समोरच्या भागात बसलेल्या आहेत. इतर मुले मागे हसत खेळत दिसत आहेत. 


फुटेजमध्ये ड्रायव्हर दिसला नाही 
- ड्रायव्हर राहुल फुटेजमध्ये दिसला नाही. त्याचे कारण म्हणजे कॅमेरा त्याच्या सीटच्या मागे लावलेला होता. 
- फुटेजमध्ये दिसत आहे की, बायपासवर पोहोचताच ड्रायव्हर पुलाच्या डिव्हायरच्या अगदी जवळून गाडी चालवत आहे. 
- बसचा वेगही जास्त असल्याचे जाणवते. डिव्हायडरला बसचे चाक धडकताच कॅमेरा तुटून काली पडला आणि फुटेज बंद झाले. फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी ते सील केले आहे. आता कोर्टात ते सादर केले जाणार आहे. 


स्कूल स्टाफने म्हटले, मीडियासमोर बोलू नका 

- सोमवारी डीपीएसचे प्रिन्सिपल सुदर्शन सोनार आणि स्टाफचे काही मेंबर मृत कृती अग्रवालच्या घरी गेले होते. 
- बोलताना एक स्टाफ मेंबर नातेवाईकांना म्हणाले की, तुम्ही सर्वकाही मीडियासमोर बोलणे बंद करा. हे ऐकताच सर्व नातेवाईक सुन्न झाले. 
- dainikBhaskar.com शी बोलताना कृतीचे आजोबा ओमप्रकाश सांघी म्हणआले, सोमवारी शाळेतील प्रिन्सिपलसह 10 जण आले होते. आम्ही त्यांच्यासमोर म्हणणे मांडले तर ते आम्हालाच म्हणाले की, हे नाटक का करत आहात. मी भडकलो तेव्हा त्यांनी माफी मागितली. 
- याबाबत आमच्या प्रतिनिधींनी शाळेचे प्रिन्सिपल सोनार यांच्याशी चर्चा केली. नाटकच्या मुद्द्यावर उत्तर मागितले तेव्हा त्यांना फोन कापला. 
- भोपाळचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे की, ज्या शाळा नियम मान्य करणार नाहीत, त्यांची मान्यता रद्द करू. 


बसचे स्टेअरिंग फेल झाले नव्हते 
- डीपीएसच्या ज्या बसच्या अपघातात चार मुलांनी प्राण गमावले, त्याचे स्टेअरिंग फेल झालेले नव्हते. एएसपींच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. 
- एएसपी प्रशांत चोबे यांनी 24 तासात तपासाचा अहवाल सादर केला आहे. त्यात अपघाताचे मुख्य कारण जास्त वेग होता असे सांगण्यात आले. इतर दोन बाबींवरही चर्चा सुरू आहे. ड्रायव्हर बस चालवताना फोनवर बोलत होता का? आणि बस चालवताना त्याला डुलकी आली आणि त्यामुळे अपघात घडला का? याचे कारण म्हणजे, ड्रायव्हरच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टीच्या दिवशी ड्रायव्हर राहुल याला बोलावण्यात आले होते. तो एका कार्यक्रमातून आलेला होता आणि खूप थकलेलाही होता. 

 

 

बातम्या आणखी आहेत...