आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे IPS दिवसातून 6 वेळा करतात जेवण, असे आहे त्यांच्या दमदार फिटनेसचे रहस्य..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - बॉलीवूडमध्ये चुलबुल पांडे, सिंघम आणि राउडी राठौर अशा सुपरकॉप भूमिका प्रेक्षकांना खूप आवडलेल्या आहेत. खाकी वर्दीत जेव्हा दमदार पर्सनॅलिटी आणि फिटनेसवाले अॅक्टर्स डायलॉग हाणतात तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतो. परंतु, येथे एक असा रिअल लाइफ हीरोही आहे, ज्यांच्या फिटनेसमुळे अवघे पोलिस डिपार्टमेंट आणि पोलिस कर्मचारी त्यांना आपला आयकॉन मानतात. DivyaMarathi.Com शी खास बातचीत करताना IPS सचिन यांनी आपला एक्सरसाइज आणि डाएट चार्ट शेअर केला. 

 

बिझी शेड्यूलमध्येही घेतात फिटनेसची अशी काळजी...
उज्जैनमध्ये एसपी पदावर कार्यरत 2007 च्या बॅचचे IPS सचिन अतुलकर जेथेही जातात, तेथे तरुण-तरुणी त्यांना सेल्फीची रिक्वेस्ट करू लागतात. प्रचंड व्यग्र वेळापत्रकातही ते आपल्या फिटनेसला नियमित वेळ देऊन एक्सरसाइज करतात, कधी-कधी योगाही करतात. हेच त्यांचे दमदार फिटनेसचे सीक्रेट आहे. ते नेहमी इतरांनाही फिट राहण्यासाठी प्रेरित करतात.

 

पहिल्या प्रयत्नात बनले IPS
- फक्त 22 वर्षे वयातच आयपीएस अधिकारी बनलेल्या सचिन अतुलकर यांनी पहिल्याच प्रयत्नात सिव्हिल एक्झाम उत्तीर्ण केली होती.
- सचिन म्हणाले- त्यांनी ग्रॅज्युएशन नंतर सिव्हिल सर्विसेसची एक्झाम दिली होती आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले.
-IPS सचिन यांचा जन्म भोपाळमध्ये झाला होता. त्यांचे वडील फॉरेस्ट सर्विसमधून निवृत्त असून भाऊ आर्मीत आहे.

 

हॉर्स रायडिंगमध्ये जिंकले आहेत गोल्ड
- शालेय शिक्षणासोबतच सचिन स्पोर्टसमध्ये चांगले होते.
- खेळात विशेष आवड असल्याने 1999 मध्ये सचिन यांनी राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळले.
- क्रिकेटशिवाय IPS ट्रेनिंगदरम्यान हॉर्स रायडिंगला त्यांनी आपला छंद बनवले.
- वर्ष 2010 मध्ये हॉर्स रायडिंगच्या राष्ट्रीय पातळीवरील शो जंपिंगमध्ये अतुलकर यांना गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या IPS नी कोणती एक्सरसाइज आणि डाएट चार्ट फॉलो करून बनवली अशी दमदार बॉडी..  

बातम्या आणखी आहेत...