आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्वाल्हेर - स्वत:ला आमदाराचा पुतण्या सांगणाऱ्या एका तरुणाने एका तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून आपल्यासोबत राहायला लावले. सोबत राहताना तरुणी दोन वेळा प्रेग्नंट झाली आणि दोन्ही वेळा तरुणाने अबॉर्शन केले. तिसऱ्या वेळी प्रेग्नंट झाली तेव्हा तरुणाने पुन्हा अबॉर्शन करण्यासाठी दबाव टाकला. तरुणीने नकार दिल्यावर धमकी देऊन तिला घराबाहेर काढले. आता तरुणीने पोलिसांत जाऊन याची तक्रार दिली आहे.
असे आहे प्रकरण...
-हे प्रकरण गोल पहाड़िया परिसरातील आहे. येथील रहिवासी दीपक यादवची 2016 मध्ये एका तरुणीशी ओळख झाली. दीपकने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तरुणी तयार झाली, परंतु दोघेही बिनालग्नाचे सोबत राहू लागले.
-लिव्ह इन रिलेशनमध्ये राहताना तरुणी दोन वेळा प्रेग्नंट झाली आणि दोन्ही वेळा दीपक यादवने तिचे अबॉर्शन केले. तरुणीने विरोधही केला पण दीपकने काहीएक ऐकले नाही. एवढेच नाही, तर तिच्याशी लग्नही केले नाही.
- दरम्यान, तरुणी पुन्हा एकदा प्रेग्नंट झाली. दीपकने पुन्हा तिच्यावर अबॉर्शनसाठी दबाव टाकला. या वेळी तरुणीने अबॉर्शन करायला नकार दिला व म्हणाली, मी यावेळी मूल होऊ देणार आहे.
अबॉर्शनसाठी नकार दिल्याने घराबाहेर काढले...
-दीपकने तिला मारहाण करून घराबाहेर काढले. तरुणीने विरोध केला तेव्हा तो म्हणू लागला, माझा चुलता आमदार आहे आणि तू कुठेही जाऊन तक्रार कर, माझे काहीच वाकडे करू शकत नाहीस.
- शेवटी त्रस्त होऊन तरुणी आपल्या वडिलांकडे गेली आणि मग एसपी डॉ. आशिष कुमार यांना तक्रार करायला पोहोचली. तरुणीचे म्हणणे आहे की, लग्न करतो म्हणून दीपकने तिला सोबत ठेवले होते, पण आता धमकी देत आहे.
- याप्रकरणी एसपी डॉ. आशिष कुमार म्हणाले की, तक्रारीची चौकशी केली जात आहे आणि ज्या पद्धतीने महिलेने आरोप केले आहेत, ते खूप गंभीर आहेत. कारवाई केली जाईल.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.