आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीची सुरु होती बर्थडे पार्टी, तरुणाने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेत मारली तिला मिठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छिंदवाडा (मध्यप्रदेश) - छिंदवाडा येथे एका तरुणाने पेटवून घेत तरुणीला मिठी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने तरुणीच्या बर्थडे पार्टीत प्रवेश करुन स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले आणि तिला मीठी मारली. या घटनेत दोघेही गंभीर भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूरमध्ये हलवण्यात आले आहे. येथे तरुणाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी युवकाविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

कॅमेरात कैद झाली घटना... 
- ही घटना गुरुवारी सायंकाळी छिंदवाडा येथील एका हॉटेलमध्ये घडली. आरोपी नवनीत जूनघरे याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि पेटवून घेतले.
- आगीच्या ज्वाळा निघत असताना नवनीतने युवतीला मिठी मारली आणि दोघेही जमीनीवर कोसळले. घटनास्थळी त्यावेळी मुलीचे वडीलही उपस्थित होते. 
- हॉटेलमध्ये उपस्थित लोकांनी तत्काळ त्यांच्यावर पाणी ओतले आणि कपडा टाकून आग विझवली. 
- हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हा संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे. 
- फुटेजमध्ये दिसत आहे की युवक हॉटेलमध्ये प्रवेश करतो आणि मुलगी त्याच्यापासून अंतर राखत असते. त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. मात्र तो स्वतःला पेटवून घेत तिला मिठी मारतो. 

 

काय आहे प्रकरण 
- अश्लील फोटो व्हायरल करण्याचा युवकावर  आरोप आहे. त्याच्याच गावातील तरुणीचे अश्लील फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्याचा त्याच्यावर आरोप असून गुन्हा दाखल झाला आहे. 
- मीडिया रिपोर्टनुसार आरोपीला या प्रकरणी अटक झाली होती आणि जामिनावर तो बाहेर आला होता. तेव्हा त्याने साक्षीदार तरुणीवर तिचा जबाब बदलण्यासाठी दबाव टाकला.  
- तिने ऐकले नाही तेव्हा त्याने स्वतः पेटवून घेत तिला मिठी मारली. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेच्या प्रत्येक क्षणाचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...