आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर- धार जिल्ह्यातील एका आईने आपल्या 11 महिन्याच्या मुलीचा खून केल्याची घटना घडली आहे. ही चिमुकली दुध पीत असताना रडत होती. तिला शांत करण्याचा प्रयत्न ही महिला करत होती पण या चिमुकलीचे रडणे थांबत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या या महिलेने तिचा खून केला. या घटनेनंतर चिमुकलीने जागीच प्राण सोडले. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले आहे.
- पोलिसांनी सांगितले की ही घटना तलवाड़ी पटेलपूरा या गावात घडली. दुपारच्या वेळी आरोपी महिला आपल्या चिमुकल्या मुलीसह घरात एकटी होती. चिमुकली दुधासाठी रडत होती. महिलेना तिला दुध पाजत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण चिमुकली भूकेमुळे रडतची होती. यामुळे संतापलेल्या महिलेने या चिमुकलीच्या गळ्यावर कोयता मारला. त्यामुळे जखम होऊन रक्तस्त्राव झाल्याने या चिमुकलीने प्राण सोडले.
चुलत सासू किंचाळली
- ही घडली त्यावेळी या महिलेची चुलत सासु घराबाहेर झोक्यावर बसली होती. चिमुकलीचा रडण्याचा आवाज बंद झाल्याने ती त्यांच्या घरी गेली. त्यावेळी आरोपी महिला दरवाजा लावून चालली होती. त्यावेळी या महिलेच्या हातात बाळ नसल्याने तिच्या चुलत सासूला शंका आली. तिला लोकांना वोलवून दरवाजा घडला तर समोर चिमुकली रक्त्याच्या थारोळ्यात पडली होती. हे दृश्य पाहून महिलेची चुलत सासू किंचाळली.
रडत असल्याने केला खून
- चुलत सासुने याबाबत जाब विचारल्यावर आरोपी महिलेने ती रडत असल्याने खून केल्याचे सांगितले. घटना घडली त्यावेळी महिलेचा पती कामावर गेला होता. तर त्यांची चार वर्षाची मुलगी सासूसोबत शेतात गेली होती.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.