आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 फुट खोल दरीत फेकले, दगड टाकले; तरीही तो जिवंत परतला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - मृत्यूच्या दाढेतून 5 दिवसांनंतर परतलेला बीएससीचा विद्यार्थी मृदुल भल्ला याचा जीव त्याच्या मित्रांमुळेच वाचला आहे. 3 जणांनी त्याचे अपहरण करून 400 फुट खोल दरीत फेकले होते. तो मरावाच याची खात्री करून घेण्यासाठी त्याच्यावर दगड सुद्धा फेकले. तरीही पाच दिवसानंतर तो आपल्या मित्र आणि नातेवाइकांच्या मदतीने जिवंत परतला आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवला नसता तर मृदुल दोन दिवसांत सापडला असता. पण, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तो 5 दिवस तळपत होता. परदेशीपुरा पोलिसांच्या निष्काळजीपणाची तक्रार आता वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस पथकाला जाहीर केलेले 20 हजार रुपयांचे बक्षीस रद्द केले आहे. 

 

मित्रांनी असा वाचवला जीव...
- मृदुलचा काहीच पत्ता लागत नसल्याचे पाहता, रुममे सौरभ आणि बृजेश सर्वप्रथम परदेशीपुरा पोलिस स्टेशनला गेले. मात्र, ठाणे अंमलदार राजीव त्रिपाठीने अशा प्रकारचे 100 केस दररोज येत असल्याचे सांगत प्रकरणावर दुर्लक्ष केले. 
- मित्रांना मृदुलचा पहिला सुगावा सीसीटीव्ही फुटेजमध्ये लागला. यात मृदुल फोनवर बोलताना रस्त्यावर चालत होता. पण, अचानक कॅमेऱ्याच्या रेंजमधून बाहेर गेला. 
- पुढे एका हेअर सलूनवर लावलेल्या सीसीटीव्हीत काही लोक मृदुलला अचानक उचलून घेऊन गेले. काही लोक त्याच्या मागे देखील धावले. हा प्रकार सलून मालकाने देखील पाहिला. 
- मृदुलच्या मित्रांनी वेळीच पोलिस नियंत्रण कक्षाकडे धाव घेतली तसेच कारच्या नंबरची चौकशी सुरू केली. 
- कारचे नंबर आणि मालकाचा पत्ता देखील मिळाला. पण, दिवसभर पोलिसांनी कुणालाही अटक केली नाही. 
- यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्यासह मित्रवर्ग आरोपी आकाशच्या घरी पोहोचले त्याने आपला गुन्हा मान्य केला. तसेच सर्वांना घटनास्थळी घेऊन गेला. 
- त्यावेळी सुद्धा आंधार झाल्याने पोलिसांनी तपास करण्यास स्पष्ट नकार दिला. आपल्याकडे साधी टॉर्च सुद्धा नसल्याचा बहाणा केला. 
- दुसऱ्या दिवशी मित्रमंडळी खाली उतरली, तेव्हा मृदुल थंडीने स्वतःचे अंग चोरून बसलेल्या अवस्थेत जिवंत सापडला. 


डॉक्टर म्हणाले, यामुळे वाचला...
- डॉक्टर म्हणाले, मृदुलचे हात-पाय थंडीमुळे आखडले होते. त्याच्या फुप्फुस, हृदय आणि लिव्हरला जास्त दुखापत नव्हती. 
- दगडांमुळे जखमा झाल्या परंतु पोटावर पडल्याने ब्लीडिंग थांबली होती. जखमांमध्ये इंफेक्शनही झाले नव्हते. श्वास घ्यायलाही त्रास झाला नाही, म्हणूनच तो जिवंत वाचला.

 

प्रेयसीचा काका बनून भेटायला बोलावले...
- मुख्य आरोपी आकाश राजू रत्नाकर (24) क्वीन्स टॉवर नौलखा येथील राहणारा आहे. त्याला मृदुल त्याच्या प्रेयसीशी बोलत असल्याचा संशय होता.
- त्याने मित्र विजय सीताराम परमार (20) आणि रोहित ऊर्फ पीयूष सुरेश परेता (23) यांच्यासह मिळून आपल्या भावाच्या स्विफ्ट कारधमून मृदुलचे अपहरण केले होते.
- मृदुलचा रूममेट सौरभ सेन म्हणाला की, 7 जानेवारीला तो नाश्ता करून येतो असे म्हणून निघाला होता. 
- त्याला आकाशने एका दूधवाल्याची गाडी थांबवून त्याच्या मोबाइलवरून फोन करून प्रेयसीचा काका बनून भेटायला बोलावले होते.
- तो सांगितलेल्या स्थळावर पोहोचताच त्याचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा पलासिया चौकात कॅमेऱ्यात एक संशयित कार दिसली.


पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...