आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नपत्रिका वाटपासाठी निघालेल्या माय-लेकाचा ऑन द स्पॉट मृत्यू, क्षणात पसरले दुःखाचे सावट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
NH 8 वर झालेल्या अपघातात माय-लेकाचा जागेवरच मृत्यू झाला. - Divya Marathi
NH 8 वर झालेल्या अपघातात माय-लेकाचा जागेवरच मृत्यू झाला.

अंकलेश्वर - नॅशनल हायवेवर ट्रक-बाइक यांच्यात झालेल्या अपघातात लग्नपत्रिका वाटपासाठी जात असलेल्या माय-लेकावर काळाने घाला घातला आहे. जखमी पित्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भरुच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरु केली आहे. 

 

ट्रकने मारली जोरदार धडक 
- भरुच जवळ झनोर गावात सोळंकी परिवारातील मुलीच्या लग्नाची लगबग सुरु होती. लग्नपत्रिका वाटपासाठी बलवंतसिंह सोळंकी पत्नी विभाबेन आणि मुलगा वेदांतला घेऊन सूरतला निघाले होते. 
- सोळंकी बाइकने सूरतल जात असताना नॅशनल हायवे क्रमांक 8 वर ट्रकने त्यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. यामध्ये मुलगा आणि आईचा जागेवरच मृत्यू झाला आहे. 
- अपघाताची माहिती मिळताच 108 अॅम्ब्यूलन्स घटनास्थळी पोहोचली. भरूच पोलिसांनी अज्ञात ट्रक ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. 
- माय-लेकाचा जागेवरच मृत्यू झाला तर बलवंतसिंह सोळंकी जखमी आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहे.

- सोळंकी परिवारात काही क्षणांपूर्वी आनंदाचे वातावरण होते, ते अपघाताने दुःखात बदलले. संपूर्ण घरावर शोककळा पसरली आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा घटनास्थळाचे फोटो...  

बातम्या आणखी आहेत...