आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस-कंटेनरची धडक; खिडक्यांचे काच फुटून बाहेर फेकले गेले लोक, रस्त्यावर असे पडले होते मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्यावर पडलेला तरुणाचा मृतदेह. - Divya Marathi
रस्त्यावर पडलेला तरुणाचा मृतदेह.

इंदूर - उज्जैन मार्गावर मंगळवारी पहाटे बस आणि कंटनेनरची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की बसमधील समोरच्या सीटवरील प्रवासी काच तोडून बाहेर फेकले गेले. यात 3 जणांचा जीव गेला असून  बस ड्रायव्हर स्टेरिंगमध्ये फसला होता. बसमधील 30 प्रवाशी गंभीररीत्या जखमी आहेत. घोंसला येथील परिमाता मंदिराजवळ हा अपघात झाला. 


असा झाला अपघात 
- बह्रमाणी ट्रॅव्हल्सची बस मंगळवारी सकाळी उज्जैनहून निघाली होती. बस चालकाने घोंसला येथील परिमाता मंदिराजवल एका टेम्पोला ओव्हरटेक केले आणि पुढे निघण्याच्या तयारीत होता. तेव्हाच समोरुन येणाऱ्या कंटेनरला जाऊन बस धडकली. 
- अपघात एवढा भीषण होता की बसमधील प्रवाशी काचेवर अदळून काच तोडून बाहेर फेकले गेले. तर मागील प्रवाशी आपल्या जागेवरुन कित्येक फूट दूर उडाले. 
- अपघातानंतर बस ड्रायव्हर स्टेअरिंमध्ये फसला. काही प्रवाशीही सीटखाली आणि इतरत्र अडकले होते. 
- तिथून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यासोबतच मदतकार्यासाठी धावले, अॅम्ब्यूलन्सला कॉल केला. 
- जखमी प्रवाशांना घट्टिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही प्रवाशांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले तर गंभीर स्थिती असलेल्यांना उज्जैनला रेफर करण्यात आले. 

जखमींची नावे 
- इश्वर मीणा, शेषराव बापूलाल, सशीला दिनेश, मनोहर नारायणसिंह, चेतना दिनेश, एश्वर्या दिनेश, हिमांशू जोशी, फुलसिंह पर्वतसिंह, दिनेश दुलाजी हे जखमी आहे. गोविंद सिंह आणि आणखी दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. 


पुढील स्लाइडवर पाहा, घटनास्थळाचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...