आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघातात 7 जण ठार; डंपरखाली असे दबलेले होते मृतदेह, पायाचा पंजा तुटून लांब पडलेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - बैतूल जिल्ह्याच्या बोरदेही परिसरात बोरदेही-मुलताई रस्त्यावर बुधवारी-गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात घडला. यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, डंपरच्या खाली दोन मृतदेह फसलेले राहिले, तर मतृदेहाचा पायाचा पंजा दूर जाऊन पडला. नंतर फसलेल्या मृतदेहांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

 

आधी झालेल्या अपघातग्रस्तांना मदत करायला गेले, भरधाव डंपरने मागून चिरडले

- काही जण कार आणि बाइकच्या धडकेनंतर जखमींना मदत करण्यासाठी रात्री मोबाइल टॉर्च घेऊन पोहोचले. दोन जखमींना नागपूरला नेण्यात आले.
- मदत करणाऱ्या माणसांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोरदार धडक दिली आणि डंपर उलटले. यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. यातील एक मृतदेह उडून दूर फेकला गेला, तर दोन मृतदेह डंपरच्या खाली चिरडून गेले.

- सूत्रांनुसार, गावकरी जखमींची मदत करत होते. तेवढ्यात रस्त्यावर वेगाने आलेल्या डंपरने गावकऱ्यांना धडक मारली आणि उलटला. यात 7 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाले.

- घटना ब्राह्मणवाडा गावाजवळ घडली. मृतांमध्ये 3 खेडलीबाजार आणि 3 नागपूरचे तरुण असल्याचे सांगण्यात आले.
- दुर्घटनेत सोहेल, आदित्य, मोहन रा. नागपूर, विनायक पारखे खेडली बाजार, गोविंद गिरी गोस्वामी, शुभम बिहारे आणि ब्राह्मणवाडाचे  शिवराम पवार यांचा मृत्यू झाला आहे.

 

2 गंभीर जखमींना नागपूरला नेले
- घटनेची माहिती मिळताच बैतूलचे अतिरिक्कत पोलिस अधीक्षक घनश्याम मालवीय, मुलताई नगर निरीक्षक सुनील लाटा पथकासह पोहोचले. पोलिसांनी मृत 7 जणांचे मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवले. तर 2 जखमींना दीपक साहू व विपूल यांना नागपूरला रेफर करण्यात आले.

 

घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
- मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्विट करून लिहिले की, सात अनमोल जिंदगी चली गईं. ते म्हणाले, ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती द्यावी.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी फोटोज

बातम्या आणखी आहेत...