आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पप्पा-पप्पा उठा, मम्मी किचनमध्ये लटकतेय... हातावर लिहिले होते मृत्यूचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस नेत्यामुळे त्रस्त होऊन महिलेने आत्महत्या केली. - Divya Marathi
काँग्रेस नेत्यामुळे त्रस्त होऊन महिलेने आत्महत्या केली.

अशोकनगर(भोपाळ) - शहराच्या एका तरुणामुळे त्रस्त होऊन महिलेने फाशी घेऊन आत्महत्या केली. घटना शुक्रवारी दुपारी साडे 12 वाजेची आहे. विवाहितेने आपल्या हातावर सुसाइड नोटही लिहिली आहे, ज्यात तिने माजी काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या मुलाने त्रास दिल्याचे लिहिले आहे. घटनेबाबत कळताच कुटुंबीयांनी डायल 100 वर माहिती दिली. 3 वेळा कळवल्यावर पोलिस तासाभराने घटनास्थळी पोहोचले. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारीही तेथे आले, मग तब्बल 3 तासांनी मृतदेहाला फासावरून उतरवण्यात आले. 

 
असे आहे प्रकरण...
- पोलिसांच्या मते, फूलबाई वीरेंद्रसिंह कुशवाह या महिलेने आपल्या घराच्या किचनमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. विवाहितेचे वय 30 वर्षे सांगण्यात आले आहे. आत्महत्येआधी तिने आपल्या हातावर सुसाइड नोटही लिहिली आहे.
- घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी शेजारी राहणाऱ्या पहलवानसिंह कुशवाह यांच्या मोबाइलवरून दुपारी 12:55 वाजता डायल 100 वर माहिती दिली. तरीही पोलिस आले नाही म्हणून दुपारी 1:10 वाजता पुन्हा याच नंबरवरून कॉल केला.
- यानंतर दुपारी 1:20 वाजता पोलिस घटनास्थळी आले. टीआय आणि तपास अधिकारी येण्याची वाट पाहत ते बाहेर गर्दीसोबत उभे होते. यानंतर दुपारी 1:30 वाजता पोलिस पथकासह घटनास्थळी आले.
- वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर फॉरेन्सिक टीमला सूचना देण्यात आली. यानंतर दुपारी 3.30 वाजता फॉरेन्सिक टीम आल्यावर मृतदेह खाली उतरवण्याची कारवाई पुढे जाऊ शकली.

 

चिमुकली येऊन म्हणाली, पप्पा मम्मी तर किचनमध्ये लटकत आहे...
- मृत विवाहितेचे वीरेंद्र कुशवाह म्हणाले की, ते गुरुवारीच नातेवाइकांच्या येथून परतले होते, शुक्रवारी दुपारी 12 वाजता ते बाजूच्या खोलीत झोपलेले होते आणि त्यांची पत्नी स्वयंपाक करायचा असल्याचे सांगून किचनमध्ये गेली. यानंतर 45 मिनिटांनी माझी 3 वर्षांची मुलगी राधिकाने मला खोलीत येऊन उठवले. म्हणाली की, पप्पा उठा, मम्मी किचनमध्ये लटकत आहे, ती काहीच बोलत नाहीये.. तेव्हा मी ताबडतोब उठून तिथे गेलो तेव्हा मला ती फासावर लटकल्याचे आढळले. यानंतर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना याची माहिती दिली.

 

काय म्हणतात पोलिस?
- एफएसएल अधिकारी म्हणाले, प्राथमिकदृष्ट्या महिलेने आत्महत्या केल्याचे दिसत आहे. महिलेने आपल्या हातावर सुसाइ नोटमध्ये लिहिले की, धर्मेंद्र चौधरी यांचा मुलगा बॉबी 3 महिन्यांपासून तिला त्रास देत होता. तथापि, धर्मेंद्र चौधरी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
- दुसरीकडे काँग्रेस नेते धर्मेंद्र चौधरी म्हणाले की, या प्रकरणाचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे. आम्हाला विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज व व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...