आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्कवर व्हायरल होत आहे #बिंदी कॅम्पेन, दीपिका-आलियाही झाल्या सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चला आपण मजबुतीने एकमेकींची साथ देऊ या. एकमेकींचा आधार बनुया. - Divya Marathi
चला आपण मजबुतीने एकमेकींची साथ देऊ या. एकमेकींचा आधार बनुया.

इंदूर - सोशल नेटवर्किंग साइटवर बिंदी ट्विटर कॅम्पेन चर्चेत आहे. वेगाने यामध्ये महिलांसोबतच सेलिब्रिटी सहभागी होऊ लागल्या आहेत. या कॅम्पेनच्या माध्यमातून महिला आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत आहेत. ट्विटरवर कलरफुल टिकली लावलेल्या महिला सेल्फिज अपलोड करत आहेत. त्यासोबत महिला असल्याचा अभिमान आहे असे वाक्य महिला लिहित आहेत. याआधी मी टू आणि टाइम्स अप सारख्या कॅम्पेनच्या माध्यमातून जगभरातील महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

 

सेलिब्रिटीही सहभागी... 
- या कॅम्पेनमध्ये मेट्रो सिटीच्या महिला सहभागी होत आहेत, त्यासोबतच दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, उषा उथ्थुप सारख्या अनेक सेलिब्रिटी सहभागी झाल्या आहेत. त्यांनी या कॅम्पेनबद्दल ट्विट केले आहे. 
- #बिंदी कॅम्पेनमध्ये महिला या त्यांच्यातील सकारात्मक बाजू पुढे आणत आहेत. महिलांची उपेक्षा, जेंडर ऑडिट, समानता, याबद्दल महिलांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. टिकलीला केंद्रस्थानी ठेवून महिला व्यक्त होत आहेत. 

 

दीपिका-आलियाचा सहभाग
- वेगाने व्हायरल होत असलेल्या या कॅम्पेनमध्ये बॉलिवूड स्टार दीपिका, आलिया सहभागी झाल्या आहेत. 
- दीपिका आणि आलिया यांनी बिंदीचे फोटो ट्विट केले आहेत. 
- त्यांनी लिहिले आहे की महिला या समाजाच्या अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याकडे दुर्लभ करुन चालणार नाही, उलट त्यांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. 

बातम्या आणखी आहेत...